Home यवतमाळ यवतमाळ – वाशिम लोकसभेचे मतदान होताच अनेकांचे कॉल सुरू, “तुमच्याकडे काय जाललं”

यवतमाळ – वाशिम लोकसभेचे मतदान होताच अनेकांचे कॉल सुरू, “तुमच्याकडे काय जाललं”

17

विनोद पत्रे

यवतमाळ – वाशिम लोकसभा निवडणुकीसाठी दुहेरी लढत..!

यवतमाळ – दुसर्या टप्यातील लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर जवळपास १२ वाजल्या नंतर अनेक मतदारांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना कॉल करून ‘तुमच्या कडे काय चाललं’, अशी माहिती घेवून मतदारांचा अंदाज घेतला. असे कॉल रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

यवतमाळ – वाशिम लोकसभा निवडणूक ही साधी आणि सोपी वाटत असताना या निवडणुकीमध्ये एकाएकी रंग चढले, अश्यात शेवटच्या दोन दिवसात ही निवडणूक हाय व्होल्टेज होतांना अनेकांना चांगलेच माहिती होते. शिंदे, गडकरी, फडणवीस, अभिनेता गोंविदा या सर्वांनी प्रचार सभेत इंट्री मारली, त्यामुळे काही ठिकाणी पैसे हि वाटप केले पण आमच्याकडे दुहेरी तर काही ठिकाणी तिहेरी लढत होईल याचे आम्हाला काय देने घेणे .
या निवडणुकीत एकोणीस लाख लाख मतदारांनी कोणाला आपला कौल
दिला, त्यासाठी मतदान होण्या अगोदर व मतदान झाल्यानंतर अनेकांचे एकमेकांना कॉल सुरु झाले. त्यामुळे जिल्हात एकच उत्सुकता निर्माण झाली. तुमच्याकडे कोण
चाललं , आमच्याकडे तर असं चाललं, अशा प्रकारे राजकीय अंदाज काढणे सुरु आहे . याचा सर्वात मोठा फायदा शहरात व गावात सट्टे लावणाऱ्यांना होणार असून परिवर्तन होणार की नाही याची चाचपणी सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे…!  ़