Home बुलडाणा यशवर्धन सोळंके थालीफेकमध्ये अमरावती विभागात द्वितीय

यशवर्धन सोळंके थालीफेकमध्ये अमरावती विभागात द्वितीय

55
0

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:-बुलढाणा जिल्हातील दुसरबीड येथील रहिवासी व देऊळगाव राजा हायस्कूल दे. राजाचा विद्यार्थी यशोवर्धन संजय सोळंके याने राज्य सरकारच्या क्रीडा युवक संचनालय आयोजित थालीफेक स्पर्धेत अमरावती विभागातून द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. राज्यस्तरीय थालीफेक स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे.
महाराष्ट्र संचालनायाच्या वतीने आयोजित सध्या राज्य क्रीडा युवक यवतमाळ येथे सुरू आहे. या अमरावती विभागातील ५ जिल्ह्यांमधील एकूण १२ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात यशवर्धन सोळंके यानी १७ वयोगटात ३० मीटर थाली फेक फेकून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नामांकन मिळविले आहे. दरम्यान यशवर्धन सोळके यांनी धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. परंतु अनावधानाने धावण्याचा ट्रॅक समांतर सरळ रेषा सुटल्यामुळे तो त्या स्पर्धेतून बाद झाला. परंतु त्याने जिद्द न सोडता थालफेकमध्ये विभागीय स्तरातून द्वितीय येऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नामांकन मिळविले. देऊळगावराजा हायस्कूल देऊळगाव राजा या शाळेचेवतीने त्याचा २६ जानेवारीला सत्कार करण्यात आला . यशवर्धन सोळंके याचे प्राचार्य कोल्हे, क्रीडाशिक्षक मुळे, मुढे व शाळेतील शिक्षकांनी कौतूक केले.

Previous articleमुख्याध्यापकानेच केला राष्ट्रध्वज आणी राष्ट्रगिताचा अपमान? गावातील कारभारी बघ्याच्या भूमिकेत
Next articleधरणगाव तालुक्यातील घटना: लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here