Home जळगाव धरणगाव तालुक्यातील घटना: लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले

धरणगाव तालुक्यातील घटना: लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले

116

जळगाव : {आनंद पाटील}

देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना धरणगाव तालुक्यात एका ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहेमाहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवकाला अडीच हजारांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. अनिल नारायण गायकवाड (वय-५०), असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव असून ग्रामसेवकाला अटक केल्याच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार ४९ वर्षीय असून हे धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील रहिवासी आहेत. त्यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील सन-२०१५ ते २०२० या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षणा बाबतची माहिती ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून ग्रामसेवक अनिल गायकवाड यांच्याकडे मागितली होती. मात्र त्यांना ही माहिती वेळेत न मिळाली नाही.
ही सविस्तर माहिती देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम अडीच हजार रुपये एवढी ठरली होती. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पथकाने प्रजासत्ताकदिनी सापळा रचून धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे तक्रारदाराकडून अडीच हजारांची लाच घेतांना ग्रामसेवक अनिल गायकवाड यास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.