Home रायगड पोलीसाने दाखविला 125 विद्यार्थ्यांना तानाजी चित्रपट

पोलीसाने दाखविला 125 विद्यार्थ्यांना तानाजी चित्रपट

163

गिरीश भोपी – रायगड

शुर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती , लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव…

ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे हे होते. अशा सिंहासारख्या शूरवीर, निष्ठावंत मराठी सरदाराची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजली आहे आणि ह्याच शुरवीराचा पराक्रम जगासमोर मांडणारा तानाजी चित्रपट हाऊसफुल असून शूर वीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम विद्यार्थ्यांनाही माहीत व्हावा या उद्देशाने करमाळा जिल्हा सोलापूर येथील नेमणुकीला असलेले पोलीस कॉन्स्टेबल गोविंदराव चव्हाण यांनी व त्यांच्या सहकारी टीम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहू व चव्हाणवस्ती (लहू) या दोन्ही शाळेच्या 125 विद्यार्थ्यांना स्वखर्चाने तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी कुर्डूवाडी गणेश टाॅकीज येथे सोय केली मुलांना अल्पोपहार व पाणी व्यवस्था केली व खूप मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहू तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांचे तर्फे श्री चव्हाण साहेब यांचे मनापासून हार्दिक आभार मानले.

पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण साहेब यांचे कौतुक करण्यासाठी यांचा संपर्क क्रमांक 7083222089