Home विदर्भ दहीहांडा पोलीसांची नाकाबंदी दरम्यान अवैध देशी दारु ची वाहतुक करताना एकास अटक...

दहीहांडा पोलीसांची नाकाबंदी दरम्यान अवैध देशी दारु ची वाहतुक करताना एकास अटक व दुसरा फरार ..

147
0

30000 रुपयाचा अवैध देशी दारुचा मुदेमाल जप्त…

10000,अवैध देशी दारु व

20000, किंमतीची एक मोटारसायकल जप्त…

आरोपी, प्रकाश शामराव भडके अटक तर केवलसिंग ठाकुर हा फरार झाला आहे.

कुशल भगत

अकोट , दि. ३१ :- तालुक्यातील दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे व कर्मचारी हे नाकाबंदी करीत असतांना गुप्त माहिती मीळाल्या नुसार ग्राम देवरी फाट्या नजिक अवैध देशी दारू ची वाहतुक करत असतांना आरोपी प्रकाश शामराव भडके वय 55 वर्ष व केवलसिंग ठाकुर दोन्ही रा.पाथर्डी ता तेल्हारा यांच्या कडुन अवैध देशी दारुच्या 4 पेठ्या व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे पेट्या असा ऐकुन तीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हे दोघेही देवरी फाटा रोडवरुन अवैध देशी दारुची वाहतुक करत आहेत अशी गुप्त माहीती मीळाली होती या माहीती नुसार चौकशी केली असता आज रात्री 8 वाजताया दरम्यान देवरी फाटा येथे फाटा येथे रोडवर अवैध देशी दारु ची वाहतुक करत होता त्याला आज रंगेहाथ पकडुन दहीहांडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे , व पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे याच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहेत.

Previous articleतुकडोजी नगर येथील नागरीक नियमाकुल जागेअभावी घरकुलांपासून वंचित
Next articleपोलीसाने दाखविला 125 विद्यार्थ्यांना तानाजी चित्रपट
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here