Home विदर्भ तुकडोजी नगर येथील नागरीक नियमाकुल जागेअभावी घरकुलांपासून वंचित

तुकडोजी नगर येथील नागरीक नियमाकुल जागेअभावी घरकुलांपासून वंचित

477
0

जागा नियमकुल करण्यासाठी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांना निवेदन…

कोरपना – मनोज गोरे

चंद्रपूर , दि. ३१ :- कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत जेवरा अंतर्गत तुकडोजी नगर येथील नागरिक नियमकुल जागेअभावी शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित आहेत,या गावातील अनेक नागरिकांना माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घरकुल मंजूर झालेले आहेत परंतु सदर गावातील जागेचे मालकी हक्क हा सरकारचा होता,आणि भोगवटदार हे नागरिक होते,परंतु ८(अ) अभावी सदर घरकुलाचे बांधकाम होऊ शकले नाही,ते नियमकुल जलदगतीने झाले पाहिजे याकरिता भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात लाभार्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले व जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे निवेदन दिले.

‘सर्वांसाठी घरे २०२२’ या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमकुल करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम विकास विभागाने १८ आगस्ट २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे,परंतु सदर लाभार्त्यांना घरकुल मंजूर होऊन १ वर्ष लोटून सुद्धा जागा ही नियमकुल करण्यात आलेली नाही,त्यामुळे सदर लाभार्थी हे घरकुल योजने पासून वंचित आहेत,त्यामुळे सदर गावातील नागरिकांनी भाजयुमो जिल्हा सचीव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले व जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रश्नांसंदर्भात अवगत केले.
आपण यावर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा करून यावर लवकरच तोडगा काढू असे अश्वासन संध्याताई गुरनुले यांनी दिले, यावेळी सभापती सुनील उरकुडे, भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,जेवरा ग्रामपंचायत सदस्य नैनेश आत्राम,पुंजाराम नोमवाड,बालाजी वाघमारे,येसूदास येनगंटीवार,अमोल निमसटकर उपस्थित होते.

Previous articleआर एस पी हे प्रशिक्षण नसून काळाची गरज- डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक बुलढाणा
Next articleदहीहांडा पोलीसांची नाकाबंदी दरम्यान अवैध देशी दारु ची वाहतुक करताना एकास अटक व दुसरा फरार ..
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here