Home सातारा “युवा सन्मान” आदर्श पत्रकार पुरस्काराने डॉ विनोद खाडे सन्मानित…!!

“युवा सन्मान” आदर्श पत्रकार पुरस्काराने डॉ विनोद खाडे सन्मानित…!!

177

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. ३१ :- राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील कला-क्रीडा, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक,राजकीय,व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक युवतींना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने युवा सन्मान २०२० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या
सातारा येथील अक्षदा मल्टी पर्पज हॉल मध्ये संपन्न.
झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सनी मानकर,पुणे येथील युनिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुज्जमिल शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दुर्लक्षित युवकांची योग्य दखल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी
घेवुन त्यांना “युवा सन्मान 2020” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मध्ये सामाजिक कार्या बरोबरच गेली अनेक वर्षे पत्रकारिता व इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून जिल्ह्यातील जनतेचे अनेक प्रश्न वास्तव रित्या मांडून,त्याचा पाठपुरावा करणारे पत्रकार डॉ विनोद खाडे यांनाही सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सनी मानकर यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी मान्यवर व सत्कार मूर्तींनी मनोगत व्यक्त केले.अतुल पवार,अमीन आगा,योगीराज रणवरे ,अनिता धनवडे यांना सामाजिक क्षेत्रात, विनोद फडतरे, विक्रम शिंदे, संदीप काटकर, अजय शिंदे, अमर माने,विक्रांत राऊत,नरेंद्र सावंत,अजित पाटेकर, महेश पवार यांना उद्योजक, गणेश सावंत यांना राजकीय,डॉ हर्षल घोलप यांना वैद्यकीय तर डॉ विनोद खाडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक कार्याबद्दल “युवा सन्मान 2020” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, युवा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.