Home बुलडाणा अज्ञात इसमाने शेतातील उभे कपाशीचे झाडे उपटून टाकली शेतकऱ्यांचे 20 हजार रुपयांचे...

अज्ञात इसमाने शेतातील उभे कपाशीचे झाडे उपटून टाकली शेतकऱ्यांचे 20 हजार रुपयांचे नुकसान, 

526

 

भगवानराव साळवे

सिंदखेड राजा
तालुक्यातील मलकापूर पांग्रा शिवारात असलेल्या झोटिंगा फाटयावर असलेल्या रोडटच शेतीमध्ये अज्ञात इसमाने शेतात उभे असलेले कपाशीचे झाडे उपटून टाकली त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणी अज्ञात इसमाने विरुद्ध शेतमालक गजानन डिघोळे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे
याबाबत माहिती अशी की झोटिंगा फाटा येथे गजानन डिघोळे यांची शेती आहे 1 ऑक्टोबरला त्यांचा घरी कार्यक्रम असल्याने शेतात कोणी नाही याचि संधी साधून अज्ञात इसमाने शेतात जाऊन सुमारे एक एकर मधील कपाशीचे अनेक झाडे उपटून तोडून टाकली आज सकाळी शेतात आल्यावर गजानन डिघोळे याना हा प्रकार दिसला त्यावेळी त्यांनी मलकापूर पांग्रा येथे येऊन पोलिसांना माहिती दिली त्यानुसार दुय्यम ठाणेदार कानडे बीट जमादार नारायण गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतात जाऊन तोडलेल्या कपाशी पिकाची पाहणी केली याप्रकरणी शेतमालक गजानन डिघोळे यांनी साखरखेर्डा येथे जाऊन तक्रार दिली आहे अज्ञात इसमांनी खोडसाळपणे शेतात उभे असलेल्या कपाशीचे पीक उपटून आणि तोडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे या घटनेने शेतकऱ्यांनमध्ये दहशत पसरली असून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे