Home वाशिम म. गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता रथाला हिरवा झेंडा

म. गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता रथाला हिरवा झेंडा

388

स्वच्छता ही सेवा: वाशिम जिल्ह्यात जागर स्वच्छतेचा !

 

फुलचंद भगत

वाशिम:-स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात स्वच्छतेबाबत मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात येत असुन म.गांधी जयंती निमित्त स्वच्छता रथाला जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी  सुनिल निकम यांनी हिरवा झेंडा दाखवुन या उपक्रमाला अधिक गती दिली.

              भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या वतीने जागर स्वच्छतेचा हे अभियान राबविण्यात येत आहे. आता या अभियानांतर्गत स्वच्छता रथाच्या माध्यमातुन गावात जनजागृती करण्यात येणार आहे.

म. गांधी आणि लाल बहादुर शाश्त्री यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषदेच्या म. जोतीराव फुले सभागृहात सीईओ निकम यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता रथाला हिरवा झेंडा दाखवुन रथाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जल जीवन मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले, सहायक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने, प्रफुल्ल काळे, उमेश बोरकर, सु. ब.  जाधव, दिपक देशमुख,  सुमेर चाणेकर, सचिन गटलेवार, प्रविण राऊत, सुनिल मारोतकर, प्रविण आरु, सतिश लहामगे, शंकर आंबेकर, प्रकाश नांदे, प्रदिप सावळकर, अमित घुले, प्रविण पान्हेरकर, राम श्रृंगारे, प्रफुल्ल ईटाळ, डीएम श्री खुजे, विजय नागे, पुष्पलता अफुणे, अविनाश पाठक, अरविंद वारकर यांची उपस्थिती होती.