Home बुलडाणा महाराष्ट्र शासनाचा महसुल विभागाचा अभिनव उपक्रम;

महाराष्ट्र शासनाचा महसुल विभागाचा अभिनव उपक्रम;

252

शेतकऱ्यांना मोफत डिजीटल सातबारा वाटपाला अंढेरा मंडळातील अंढेरा गावातुन सुरुवात!योजनेचा लाभ घेण्याचे तहसीलदार शाम धनमने यांचे आवाहन

ज्ञानेश्वर म्हस्के – अंढेरा

महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवित असते.स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या संकल्पनेतून २आॕक्टोबर या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने शेतकऱ्यांना मोफत डिजिटल साबारा वाटपाचा शुभारंभ देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा मंडळातील अंढेरा गावातुन करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंढेरा गावाच्या सरपंच सौ.रुपालीताई आंबिलकर ह्या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून देऊळगाव राजा तहसिलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री शाम धनमने होते.अंढेरा ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या पुतळयाचे जयंतीनिमित्ताने पुजन करुन हार अर्पण करण्यात आला.

यावेळी तहसिलदार शाम धनमने यांच्या उपस्थितीत अंढेरा गावच्या सरपंच सौ.रुपालीताई आंबिलकर यांच्या शुभहस्ते मोफत डिजीटल सातबारा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.या वेळी सव्वीस शेतकऱ्यांना डिजिटल मोफत सातबारा वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन हे मोफत डिजिटल सातबारा वाटपाचा करणारे देशातील पहिले राज्य ठरले असुन महाराष्ट्र शासन नेहमीच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त विविध योजना राबवित असते.त्या ई-पिक पाहणी असो यासाठी आपल्या शेतातुन शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी अॕपवर माहिती भरण्यासाठी सातबारा महत्वाचा असुन यानिमित्ताने शेतकऱ्यांना अचुक माहीती भरण्यासाठी मदत होते. शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार शाम धनमने यांनी केले.कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी भगवान पवार,पंचायत समिती सदस्य पती प्रमोद सानप,कारभारी सानप,पोलीस पाटील संतोषराव सानप,भगवान नागरे,माजी सरपंच रविंद्र सानप,रमेश सानप,सुरेश पाटील तेंजनकर,कैलास देशमुख,नितीन नागरे,सुभाष गाडे,संतोष सानप, विष्णु केदार रामेश्वर वाघ व सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी अंढेराचे तलाठी विनोद डोईफोडे व संजय चव्हाण यांनी परिश्रम घेतले.यावेळी तलाठी मदन जारवाल,मंजिरी सोनावणे,रुपाली आनारकर महिला तलाठी व कोतवाल अलका विनकर व प्रविण राठोड हजर होते.तसेच पञकार शेख हनिफ,राधाकिसन ढाकणे व  ज्ञानेश्वर म्हस्के हजर होते.कार्यक़रमाचे सुञसंचालन भारत तेजनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संगणकीय कामकाजाचे प्रमुख शिवानंद सानप यांनी मानले.महाराष्ट्र शासनाचा महसुल विभागाचा अभिनव उपक्रम;