Home जळगाव रावेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांच्या तर्फे 50 किराणा किट चे वाटप…

रावेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांच्या तर्फे 50 किराणा किट चे वाटप…

94
0

 

रावेर (शरीफ शेख)

रावेर शहरातील 50 गोरं गरिब कुटूंबानां किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले, यावेळी माजी आमदार मनीष जैन, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,
कार्याध्यक्ष विलास ताठे, फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटिक, रावेर शहर कार्याध्यक्ष निसा हाजी , अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष इम्रान शेख यांच्या हस्ते रावेर शहरातील 50 गोरं गरिब कुटूंबाला रावेर शहराध्यक्ष शे मेहमूद शे मण्यार यांनी स्वखर्चाने किराणा किट उपलब्ध करून दिले यासाठी पिंटू महाजन, पंकज तायडे, निलेश मोरे, शुभम गिरा, यांनी वाटपासाठी परिश्रम घेतले .
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोनाची दुसरी लाट उसळली असून त्या मध्ये सर्व सामान्य माणसाचा रोजगार बुडाला आहे, त्यामुळे हाताला काम नाही म्हणून गोर गरीबांना घर चालवण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली असून
जिकिरीचं काम होत असल्याने त्या मुलंबाळा साठी थोडी का होईना पण प्रत्येकाला माणुसकीचा हात पुढे सरसावण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात शे मेहमूद शे मण्यार यांनी किराणा किट वाटपतून या संवेदनशील, आत्मियतेने , गरजूंना मोठा दिलासा नक्कीच मिळाला आहे,
तसेच शे मेहमूद यांच्या या सामाजिक कार्याचा गौरव सर्वच स्तरातून होत आहे, यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी, संघटना यांनी गोरं गरिब कुटूंबानां , गाव तांडा वस्ती येथील मजूरांना थोडी थोडी का होईना पण जिवनाश्यक वस्तूंची उपलब्धता करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे एकप्रकारे त्यांनी समस्त दात्यांना विनंती करुन सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी भावनिक आवाहन सुध्दा केले आहे.