Home विदर्भ पारवा ग्रामपंचायतीने सरकारी जागेची मालकी यमसनवार यांना दिल्या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची...

पारवा ग्रामपंचायतीने सरकारी जागेची मालकी यमसनवार यांना दिल्या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची मागणी..!

606

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी पारवा ग्रामपंचायतीने सरकारी जागेची मालकी गैरअर्जदार प्रशांत यमसनवार याचे नावाने परस्पर व अनधिकृत रित्या फेरफार करून व नोंद घेऊन सरकारी मालमत्ता प्रशांत अरुण यमसनवार यांंचे नावाने केल्या प्रकरणी सखोल चौकशी करुन फौजदारी कारवाई करण्याची मागणी संदीप जैस्वाल (पारवा) यांनी केली आहे. तक्रारीच्या प्रती प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, घाटंजी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी. डी. रणमले आदींकडे पाठविण्यात आले आहे.
पारवा येथील संदीप जैस्वाल व त्यांच्या कुटुंबियांची गट नंबर 353 ही शेतजमीन पारवा येथे असून त्यांच्या घराच्या बाजुला गैरअर्जदार प्रशांत यमसनवार यांनी अवैद्यरित्या व बळजबरीने अतिक्रमण करून दुकानाचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, या बांधकामाला जैस्वाल यांनी आक्षेप घेउन पारवा ग्रामपंचायत मध्ये माहीतीचा अधिकार कायदा अंतर्गत अर्ज सादर करुन शेताची मोजणी होई पर्यंत, दुकानाचे बांधकाम थांबविण्यात यावे, अशी विनंती केली. मात्र, पारवा ग्रामपंचायतीने जैस्वाल यांचा अर्ज विचारात न घेता गैरअर्जदार यमसनवारचे बांधकाम थांबविले नाही. पारवा ग्रामपंचायतच्या म्हणण्यानुसार सदरची जागा ही सरकारी असुन, सरकारी जागेवरच सचिव व ईतरांनी संगणमत करुन बांधकाम करण्यास मदत करून सरकारी मालमत्ता मालकी हक्कात यमसनवार यांना हस्तांतरण करुन दिल्याचा आरोप तक्रारदार संदीप जैस्वाल यांनी केला आहे. तथापि, जैस्वाल यांनी माहीतीचा अधिकार कायदा अंतर्गत पारवा ग्रामपंचायतीला अर्ज सादर केला असता, ग्रामपंचायत सचिव यांचे कडून मोघम, अस्पष्ट व खोटी माहिती दिल्याचे जैस्वाल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पारवा ग्रामपंचायतचे सचिव व ईतरां विरुद्ध फौजदारी कारवाई करुन कर्तव्यात कसूर केल्याचा गुन्हा दाखल करून ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांना पदावरून अपात्र करण्याची मागणी, संदीप जैस्वाल यांनी शासनाकडे केली आहे.

BOX…!
दरम्यान, पारवा ग्रामपंचायतचे सचिव नितीन टाके यांची प्रतिक्रिया घेतली असता, प्रशांत अरुण यमसनवार यांचा फेरफार माझ्या काळातील नसून तो फेरफार यापुर्वीच झालेला आहे. तसेच या फेरफारशी माझा अजिबात संबध नाही. अर्जदार जैस्वाल यांनी नियमानुसार कागदपत्राची फी ग्रामपंचायत कार्यालयात जमा केलेली असून नियमानुसार माहीती पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

BOX..!
तक्रारदार संदीप जैस्वाल यांची प्रतिक्रिया घेतली असता, गैरअर्जदार प्रशांत यमसनवारचे बांधकाम माझ्या व माझ्या कुटृंबियाच्या गट नं. 353 या शेताच्या हद्दीत असुन ज्यांनी ज्यांनी आमच्या हद्दीत अनधिकृत रित्या बांधकाम केलेले आहे, त्या सर्वांच्याविरुध्द आपण दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कारवाई करणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगीतले.