Home मराठवाडा राज्यात कोरोना सदृश्य परिस्थितीत सर्व औषधे ‘टॕक्स फ्री’ करा –  मराठा महासंघाची...

राज्यात कोरोना सदृश्य परिस्थितीत सर्व औषधे ‘टॕक्स फ्री’ करा –  मराठा महासंघाची मागणी

97
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

– कोरोना महामारिच्या प्रलयाने सर्व यंत्रणा हतबल झाल्या आहेत, देशभरातील कानाकोपऱ्यातून मृत्यूचे तांडव होत आहे. अशा गंभीर परिस्थिती मध्ये गरिब आणि हातावर पोट भरणारे लोक रोजगार अभावी लाॅकडाउनच्या काळात भुकबळी होत आहे या परिस्थितीत शासनाने किमान औषधी तरी टॅक्स फ्री करावीत अशी मागणी मराठा महासंघ घनसावंगी शाखेने केली आहे.

राज्यातीला नागरिक या नात्याने निवेदन वजा मागणी करन्यात येते की, कोरोना महामारी’च्या रूपाने महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आली आहे. महामारी चे प्रमाण वाढल्यामुळे सामाजिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २०२० वर्षापासून लॉकडाऊन काळामुळे बहुतांश सर्वच सामान्य नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले असून जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कुटुंबासह सर्वांना जगण्यासाठी प्रचंड आर्थिक अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे जगण्याचा गंभीर प्रश्न सामान्य माणसावर उद्भवला आहे. त्या covid-19 अर्थात कोरोना महामारी मुळे वैद्यकीय उपचारावर रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्चाचा बोजा प्रत्येक व्यक्तीला सहन करावा लागत आहे. अशा नाजूक परिस्थिती केंद्र व राज्य सरकारने राज्यात सर्व औषधे हे ‘टॕक्स फ्री’ करावीत व सर्व सामान्य माणसाला या संकटाच्या काळात दिलासा द्यावा… अशी अखिल भारतीय मराठा महासंघ घनसावंगी च्या वतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात मनोरंजनासाठी चित्रपट टॅक्स फ्री केले जातात, याच धर्तीवर माणसं जिवंत ठेवण्यासाठी सध्याच्या महामारीत व आणीबाणी सदृश्य परिस्थिती मध्ये सर्व औषधे ‘टॅक्स फ्री’ करणे गरजेचे वाटते. म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यात औषधे ‘टॅक्स फ्री’ केली पाहिजेत… या मागणीचा मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांनी गांभिर्याने विचार करावा व तात्काळ निर्णय घ्यावा… व राज्यामध्ये स्पष्टपणे जाहीर करावे ही विनंती.
कळावे,

यावेळी निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघ घनसावंगी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण यादव, तालुका उपाध्यक्ष गणेश ढेरे, युवक तालुकाध्यक्ष गणेश गदम, गणेश ढेरे,शरद ढेरे, गणेश एस काळे, साहेबराव वाघ,मोबीन बागवान व आदिचे नेवेदना वर नावे आहेत

या निवेदनाची एक प्रत आरोग्य मंत्र्यांसह अरविंद देशमुख
मराठा महासंघ जालना जिल्हा अध्यक्ष यांना माहीतीस्तव देण्यात आली आहे.

ई-मेल द्वारे