Home जळगाव विवरे येथील जिलानी मियाँ फाऊंडेशन कडून नरसिंहनंद आंनद यांच्यावर कारवाईसाठी पालकमंत्री गुलाबराव...

विवरे येथील जिलानी मियाँ फाऊंडेशन कडून नरसिंहनंद आंनद यांच्यावर कारवाईसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, व आमदार शिरीष दादा चौधरी यांना निवेदन

88
0

रावेर (शरीफ शेख)

भारतीय संविधानातील तरतुदी नुसार प्रत्येक व्याक्तीस धर्म स्वातंत्र व भाषण स्वातंत्र देऊन हक्क व अधिकार प्रदान केलेले असुन दिलेल्या हक्क व अधिकाराचा स्वैराचार करणे बेकायदेशीर असंविधानीक आहे,
नरसिंहनंद यांनी भारतातील संपुर्ण मुस्लीम बांधवाचे पुज्यनिय धार्मिक आस्था,श्रध्दा प्रेरणा असलेले प्रेषित मोहम्मंद स.अ.व यांची अपमान जनक हेतुत केलेल्या वक्तव्य हे असंविधानीक तथा मुस्लीम बांधवांची धर्माची व प्रेषित यांची केलेली बदनामी आहे. तसेच असे बदनामीकारक वक्तव्याची पुनरावृती निवेदनात टाळले आहे.
नरसिंहनंद आंनद यांनी असवैधानीक धर्माविरोधी तथा मुस्लीम धर्माचे प्रेषितव मुस्लीम धर्माची बदनामी करून संपुर्ण देशातील राष्ट्रीय, एकात्मता, शांतता, सुव्यावस्था, तसेच भारत देशातील अल्पसंख्यक मुस्लीम बांधवाच्या धार्मिक भावनांचा भंग केलेला असुन ही बाब अतिषय निंदनीय आहे. मुस्लीमाचे प्रेषित व धर्मावर अपमानकारक निंदनीय टिका टिपणी करून संपुर्ण देशात व्देषात्मक वातावरण निर्माण करणारे व्याक्तीवर कायदेशिर कारवाई करण्याची मांगनी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच मुस्लीम प्रेषित यांचे वर केलेल्या बदनामी भाषणाची सर्व भारतात सोशल मिडीया यु ट्युब फेसबुक तसेच आदी प्रसारीत होत असलेले व झालेले व्हिडीओ याचे वर त्वरीत प्रतिबंध करून पुर्णत बंद करावे तसेच नरसिंहनंद सरस्वती यांचे धर्म विरोधी भाषणावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मांगनी ही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन शाहरुख शेख,
अजहर खान, कफिल अहेमद ,
शाहरुख खान आदींनी दिले आहे.