Home नांदेड मांडवीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक निलंबित.

मांडवीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक निलंबित.

72
0

मजहर शेख, नांदेड

मांडवीत वनपरिक्षेत्र अधिकारी लागोपाठ निलंबनाची हॅट्रिक

नांदेड / किनवट,दि : १२:-  अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मांडवीच्या वनविभागाची कसून चौकशी झाली त्यात प्रथांदर्शी दोषी आढळल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक यांना मुख्य वन सरक्षकांनी तडकाफडकी निलंबित केल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मांडवी वनपरिक्षेत्रात भ्रष्टयाचार झाल्याची तक्रार आ.भीमराव केराम यांनी वनमंत्री संजय राठोड यांचेकडे केल्यावरून उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली.त्या समितीने केलेल्या चौकशीत
वन परिक्षेत्रात अविनाश तायनाक यांच्या काळात रोपवन जल व मृद संधारण कामात वनसारक्षण कामात गंभीर स्वरूपाच्या शासकीय रकमेचा अपहार व गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.
यात जल व मृद संधारणाची कामे जागेवर न करता बोगस प्रामाणिके सादर करून शासकीय रकम खर्ची झाल्याचे दाखविण्यात आले.कामावरील मजुरांचे कुठल्याही प्रकारचे नोंदी न ठेवणे अनेक मजुरांची मजुरी एकाच गटप्रमुखाच्या खात्यात जमा इतर मजुरांना मजुरी दिल्याबाबत नोंद न केल्याबाबत रोपवन कामासाठी कुंपण कामासाठी निधी असताना ते काम न करणे,गुरे प्रतिबंधक चर कामासाठी निधी असताना काम न करणे,व खोटे प्रमाणके सादर करून खर्ची घालणे इत्यादी दोष ठेवण्यात येऊन निलंबन करण्यात आले आहे.
पुढील चौकशी व निर्णय होईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचा आदेश मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद यांनी अविनाश तायनाक यांना दिला आहे.
मांडवी वनपरिक्षत्रात यापूर्वी सन 2015 मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एन.हणमंते व त्यानंतर 2018 साली ग. ना. जाधव व आता 2020 मध्ये अविनाश तायनाक निलंबित झाल्याने पाच वर्षात तीन वनपरिक्षेत अधिकारी निलंबनाची हट्रिक झाली आहे.
या कारवासीमुळे वनविभागात खळबळ उडाली असून आणखी कुणाचा बळी जाणार काय?या बाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.