Home मराठवाडा 102 रुग्णवाहिकेचे चालक हरिदास बारगुले यांचा स्टार फाउंडेशन तर्फे कोरोना योद्धा म्हणून...

102 रुग्णवाहिकेचे चालक हरिदास बारगुले यांचा स्टार फाउंडेशन तर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मान

35
0

सलमान मुल्ला

उस्मानाबाद – कळंब येथील 102 रुग्णवाहिकेचे चालक हरिदास गजेंद्र बारगुले यांचा आज जनहितार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित स्टार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..

हरिदास बारगुले यांनी कोरोना काळामध्ये 102 रुग्णवाहिका मध्ये गरोदर मातांची सेवा व कोरोना ग्रस्त रुग्ण ने आन करणे व रुग्णवाहिकामध्ये स्वखर्चातून सैनीटायझर मशीन बसवणे ची व्यवस्था करणे अशी महत्त्वपूर्ण कामे बजावले आहेत या कामाची दखल घेवून..हा सन्मान करण्यात आला आहे या प्रमाणपत्रावर स्टार फाउंडेशन चे अध्यक्ष सय्यद मन्सूर,उपाध्यक्ष तौफिक तांबोळी,सचिव सय्यद मिया साहेब आदींच्या सह्या आहेत..

यावेळी कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वायदंडे, न.प. चे उपाध्यक्ष संजय मुंदडा,नगरसेवक सतीश टोणगे , पत्रकार सलमान मुल्ला उपस्थित होते.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे…