Home सोलापुर यशस्वी होण्यासाठी परिश्रम। , जिद्द आणि चिकाटी आवश्यक – डॉ. जयसिद्धेश्वर

यशस्वी होण्यासाठी परिश्रम। , जिद्द आणि चिकाटी आवश्यक – डॉ. जयसिद्धेश्वर

155

आयएएस योगेश कापसे यांचा नागरी सत्कार

वागदरी / नागप्पा आष्टगी

अक्कलकोटचा भूमिपुत्र योगेश कापसे यांनी परिश्रम,जिद्द,चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले असे प्रतिपादन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजीं यांनी व्यक्त केली.
विश्वगुरू महात्मा बसवेश्वर साहित्य परिषदेच्या वतीने या आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी योगेश यास सन्मानपत्र शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.अध्यक्षस्थानी पूज्य बसवलिंग महास्वामीजीं हे होते.पुढे बोलताना खासदार जयसिद्धेसश्वर म्हणाले,योगेश यांचा
संघर्ष आणि सचोटीची प्रेरणा युवकांनी घ्यावी.एका शेतकरी सामान्य कुटुंबातील मुलांनी तीन वेळा अपयश आले तरी न थकता यशस्वी झाला ही गोष्ट भूमिपुत्राना प्रेरणादायी असल्याचे बसवलिंग महास्वामीजीं यांनी सांगितले.
आपल्या सत्कारास उत्तर देताना निखिल यांनी ध्येय निश्चित केल्यास आपल्यास कसलाही अडथळा येऊ शकत नाही हे ठासून सांगितले. आपण आठवीत असतानाच जिल्हाधिकारी होण्याचे ठरवल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक स्वामींनाथ हरवाळकर यांनी केले. या वेळी दहावी बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आले.
विश्वगुरू महात्मा बसवेश्वर साहित्य परिषदेच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजीं, जिल्हाधिकारी मिलिंद बसवपीठ, मुगळीच्या पूज्य महानंदाताई हिरेमठ,पी आय सुभाष जाधव यांची उपस्थिती होती .
कार्यक्रम सोलापूर रोड, अक्कलकोट येथील गुरुप्रसाद-लक्ष्मीनारायण लॉन्स येथे दुपारी 0.४ वाजता संपन्न झाला.