Home मराठवाडा कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याकडून पोळा सनानिमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात...

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याकडून पोळा सनानिमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात टनामागे १००/- रूपये जमा

199

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शहागड येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ
साखर कारखान्याचे प्रती मेट्रिक टन शंभर रुपये प्रमाणे वाढीव रक्कम शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाले असल्याची माहिती चेअरमन तथा आमदार राजेश टोपे यांनी दिली. या निमित्ताने
७ कोटी ६९ लक्ष रुपये शेतक-यांचे बँक खात्यात वर्ग झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याचे युनिट नं.१ अंकुशनगरकडे ४,७९,९०५.८८७ मे.टन ऊस गळीत झाले असून ५,२५,०५० क्विंटल साखर उत्पादीत झाली आहे. सरासरी साखर उतारा १०.९४ टक्के मिळाला आहे. युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरीकडे २,८९,३७७.१९५ मे.टन ऊस गळीत झाले असून ३,१५,०५० क्विंटल साखर उत्पादीत झाली आहे. सरासरी साखर उतारा १०.८९ टक्के मिळाला आ.

या हंगामामध्ये कारखान्याचे दोन्ही युनिटकडे गाळप झालेल्या ऊसास सुरुवातीस पहिला हप्ता रु.२,५००/- प्रती मे.टन प्रमाणे यापुर्वी अदा केलेला आहे. यावर्षी पावसाळयामध्ये मृग नक्षत्रापासून समाधानकारक पाऊस झाल्याने ऊस पिकाची वाढ जोमाने झाली आहे. त्यातच काही शेतक-यांनी आडसाली ऊसाची लागवड केली आहे. ऊस पिकाची जोपासना व्हावी खते व मशागतीसाठी शेतक-यांना आर्थिक मदत व्हावी तसेच ‘पोळा’ सणानिमित्त आवश्यक वस्तुंची खरेदी करता यावी आणि पोळा सन उत्साहात साजरा व्हावा यासाठी रु.१००/- प्रती मे.टन प्रमाणे रक्कम संबंधीत ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. *या हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसास याहप्त्यासह एकुण रक्कम रु.२,६००/- प्रति मे.टन प्रमाणे पेमेंट ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा केले आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखाना हा मराठवाडयामध्ये ऊस भाव देण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहीलेला आहे….* यामुळे कारखान्याचा नावलौकीक झाला असून कारखान्याचे कार्याचा वेगळा ठसा उमटला आहे.

शेतकरी आर्थिक अडचणीत असून त्यांना दिलासा मिळावा यासाठी ऊस बिलाची रक्कम पोळयापुर्वी देण्याचा निर्णय मा.संचालक मंडळाशी सविस्तर चर्चा करुन समर्थ उद्योग समुहाचे मार्गदर्शक नामदार राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी घेतला आहे. शेतक-यांच्या सुखः दुःखात नेहमी सहभागी होणारे नेतृत्व म्हणून ना.टोपे साहेबांकडे पाहिले जाते. यावेळीतर त्यांनी स्वतःचे कौटूंबिक दुःख बाजुला सारुन शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखान्याचे दोन्ही युनिटकडे गळीतासाठी ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी रु.१००/- प्रती मेट्रिक टन प्रमाणे दुस-या हप्त्याची रक्कम समर्थ सहकारी बँकेच्या संबंधीत शाखेशी संपर्क साधून घेऊन जावी असे आवाहन कारखान्याकडून केले आहे.