
पर्यावरण संरक्षण संस्था यवतमाळ च्या वतीने प्रशासनाचे मानले आभार
यवतमाळ – राज्यासह संपूर्ण देशाला कोरोना विषाणूजन्य परिस्थितीने मगरमिठीत घेतले असतांना सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटातून जिल्हाला निवारण्यासाठी जिल्हाअधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्या नेतृत्वात विविध योजना राबवून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू असून हे कार्य कौतुकास्पद असल्याने स्थानिक पर्यावरण संरक्षण संस्था यवतमाळचे अध्यक्ष निरज वाघमारे यांच्या वतीने जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कोरोना संसर्गजन्य काळात यवतमाळ जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आलेख कमी जास्त असून यात जिल्ह्याचा मृत्यूदर इतर जिल्ह्यापेक्षा अत्यंत कमी आहे. कोरोना रुग्णांवर अतिशय चांगल्याप्रकारे उपचार करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या नेतृत्वात संपूर्ण प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटून कोरोनाच्या संकटाशी धैर्याने मुकाबला करीत आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. कोरोना बाधित रुग्णाचा आकडा दिवसागणीक कमी जास्त होत असला तरी कोणताही रुग्ण मृत्यू मुखी पडू नये, तो व्यवस्थित बरा होऊन आपल्या घरी गेला पाहिजे याकरिता संपूर्ण जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासन खबरदारी घेत आहे. त्याच बरोबर उपयोजनेच्या दृष्टीकोनातून जिल्हाला काही दिवस लॉक डाउन केले होते तर नंतर अर्धवेळ लॉक डाउन केल्यानंतर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने दुहेरी दायित्व सांभाळून जिल्ह्यात ठेवलेला चोख कमाल बंदोबस्त आणि त्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेची यशस्वीपणे सांभाळलेली जबाबदारी ही कौतुकास्पद असल्या कारणाने आपली सामाजिक संवेदना व्यक्त करण्यासाठी आज पर्यावरण संरक्षण संस्था यवतमाळ चे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी आपल्या सहकार्यासह जिल्हाअधिकारी एम. देवेंद्रसिंह यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पर्यावरण संरक्षण संस्थेचे दिनेश जोगडेकर, दिनेश बदमारे, तौफिक खान, जुबेर अन्सारी, सोनू मेश्राम, महेश वाघमारे, अविनाश बरसागडे, अक्षय बेलखेडे, रशीद शेख, सौरभ भोयर, शुभम गणवीर आदी उपस्थित होते.











































