Home उत्तर महाराष्ट्र मुंगसरा गावच्या युवकांचा व्हाट्सअप ग्रुप ठरला ग्रामविकासाचा आधार

मुंगसरा गावच्या युवकांचा व्हाट्सअप ग्रुप ठरला ग्रामविकासाचा आधार

179

गिरणारे – राम खुर्दळ

कोरोनाच्या महामारीने गावपातळीवर ग्रामसभा,सार्वजनिक बैठका, भेटीगाठी बंद आहे,अश्यात गावातील मुद्द्यांवर संवाद व्हावा म्हणून नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील मुंगसरा (ता.नाशिक) येथील युवक ऍड प्रभाकर वायचळे व सुरेश भोर या युवकांनी सुरू केलेल्या व्हाट्स ग्रुपने गावातील अनेक मुद्दे प्रश्न मार्गी लावण्याचे कामकाज केले आहे.

कोरोनाच्या लोकडाऊनमध्ये नागरिक व लोकप्रतिनिधी,अधिकारी यांचा संवाद व्हाट्स अपवर घडवून आल्यानेच गावातील कित्येक प्रश्न मार्गी लावता आले. अशी माहिती प्रभाकर वायचळे यांनी दै.सकाळला दिली.
आळंदीच्या बानगंगेच्या काठी वसलेल्या मुंगसरा गावाचे युवक विधिज्ञ प्रभाकर वायचळे,व सामाजिक पत्रकार सुरेश भोर या युवानी कोरोनाच्या काळात गावातील मूलभूत मुद्द्यांना वाचा फोडण्याचे काम केले,व असे अनेक प्रश्नांची सोडवणूकही संवाद व कृतीतून घडवला आहे,त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावाच्या विकासात युवकांनी अधिक अभ्यासपूर्ण लोकोपयोगी कामे केली पाहिजे. निवडून दिलेल्या व्यवस्थेला,स्थानिक खातेप्रमुख याना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली तर नक्की आपले अनेक गाव विकासाचे प्रश्न सुटू शकतात यासाठी विविध प्रयोग प्रयत्न केले पाहिजे.

तसाच प्रयत्न कोरोनाच्या स्थितीत यशस्वी पने मुंगसरा गावात झाला,यातून गावकरी-ग्रामपंचायत ग्रामअधिकारी यांच्यात घडवलेल्या संवादातून शक्य होते हेच या तरुणांनी दाखवून दिले आहे. या प्रयत्नातून मुंगसरा गावातील ,मुंगसरे गावातील व्हाट्सप ग्रामसभेच्या माध्यमातून अनके कामे झाली,गावातील सर्व गटारी जे सि बी लावून स्वच्छ करण्यात आल्या,गावातील फुल झालेल्या शौचालय टाक्या साफ करण्यात आल्या तसेच खराब झालेल्या शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली.

रेशन दुकानदाराला रेशन बरोबर पावत्या देण्यास भाग पाडले , गावात गैरहजर असलेल्या तलाठी याना गावात उपस्थित राहण्यास भाग पाडले,गावातील महिलांना मोफत मास्क वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला,गावात कचरा गोळा करण्या करता कचरा गाडी सुरु करण्यात आली.
दरम्यान ग्रामविकासाचा ध्यास घेतला व गावासाठी विविध प्रयोग राबवले,संवाद व पाठपुरावा करण्याच्या पद्धत्तीने आपण गावात मूलभूत कामे करू शकतो, यंत्रणेला कर्तव्याची जाणीव यातून होते हेच मुंगसरा गावाच्या यवांच्या प्रयत्नातून शक्य झाले आहे.

प्रभाकर वायचळे
ग्रुपचा उद्देश – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा बंद झाल्याने ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांच्यात लोकांचा संवाद व्हावा तसेच गावातील नागरिकांनी आपले मुद्दे सोशल मीडियावर मांडावे असा लोकांचा एक दबाव गट तयार करण्यात आम्ही यशस्वी झालो,यातून गावातील सामुदायिक प्रश्न सोडवता आले करता सदर ग्रुप तयार करण्यात आला,वॉट्सअप ग्रुप मध्ये गाव स्थरावरील सर्वच अधिकारी यांना समाविष्ट करण्यात आले,कामकाजाचे स्वरूप गावातील नागरिक आपल्या समस्या,तक्रारी तसेच विकासा बाबत ग्रुप वर आपले मत मांडतात ,त्यावर गावातील अधिकारी ,लोकप्रतिनिधी याना काम करण्यास विनंती केली जाते,काम न झाल्यास ग्रुप वर निवेदन दिले जाते,यातूनच गावचे कित्येक मुद्दे मार्गी लावू शकलो.

सुरेश भोर ( सामाजिक पत्रकार )
ग्रामविकासाच्या प्रयत्नात आम्ही सतत आहोत,विविध कल्पना व प्रयत्नाने लोकजागृती लोकसंवाद घडवून आम्ही गावात कोरोनाच्या स्थितीत लोकोपयोगी कामे करत आहोत.