Home नांदेड “देगलूर” त्या कोविड पाॕझेटिव्ह महिलेच्या संपर्कात आल्याने खासगी रुग्णालयातील युवक झाला कोरोना...

“देगलूर” त्या कोविड पाॕझेटिव्ह महिलेच्या संपर्कात आल्याने खासगी रुग्णालयातील युवक झाला कोरोना बाधित तर देगलूरातील कोरोना बाधितांची संख्या झाली दोन

117

नांदेड , दि. २८ ( राजेश एन भांगे ) – देगलूरच्या बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या दहा जणांच्या अहवाला पैकी शनिवारी सायंकाळी एका खाजगी दवाखान्यातील रक्ताचे नमुने घेणाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह व आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बाधित महिलेचा मुलगा व अन्य एक जणांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. कोरोना बाधितांचा आकडा दोन वर गेल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे

शहरातील लाईनगल्ली भागातील एका 59 वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती .त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या दहा जणांचा स्वॅब देगलूर येथून शुक्रवारी तपासणीसाठी नांदेडला पाठवून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या दहा जणांपैकी शनिवारी 8 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सायंकाळी एक अहवाल आला असुन तो अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तो शहरातील फॅन्सी कापड दुकानाच्या समोर असलेल्या एका खासगी रुग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करीत होता .

बाधित महिलेचे या दवाखान्यात घेऊन रक्ताच्या नमुना च्या दरम्यान संपर्क आला होता. तो बळेगावचा रहिवासी आहे. अजून दोघांचा अहवाल प्रलंबित आहे. विशेष म्हणजे दोन अहवाल येणे बाकी असून बाधित महिलेच्या मुलगा मुखेड येथील कोविंड केअर सेंटर मध्ये असून त्याचा स्वॅब तपासणीसाठी नांदेडला पाठविण्यात आला आहे त्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी आठ पर्यंत येवू शकतो असे मुखेड कोरोना सेंटरचे प्रमुख लखमावार यांनी सांगितले.