Home जळगाव पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी...

पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी – फारुक शेख अमीर

288

जळगाव :- “पत्रकार संस्था” , फैजपूर चे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख अमीर यांनी माननीय राज्यपाल यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे विनोद पत्रे हे “पत्रकार संरक्षण समिती” चे संस्थापक / अध्यक्ष असून गेली दहा वर्षापासून पत्रकारांसाठी अहोरात्र झटत आहे पत्रकारांच्या मागण्यासाठी बऱ्याच वेळी आंदोलन केले आहे एवढेच नव्हे तर पत्रकारांच्या विविध मागण्या शासनाकडून मंजूर करून घेतले आहे ते पदवीधर आहे माननीय राज्यपाल साहेबांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली तर ते राज्यातील पत्रकारांचे विविध समस्या सोडू शकतील विनोद पत्रे हे धाडसी व मनमिळावू वृत्तीचे असल्यामुळे पत्रकारांची त्यांचे चांगले संबंध आहे .

पत्रकारांचे समस्या सोडवण्यासाठी पत्रकारा मधूनच विधान परिषदेवर विनोद पत्रे यांना संधी द्यावी असे पत्र ई-मेल द्वारे माननीय राज्यपाल महोदय यांना आज दि. २८ / ०६ / २०२० रोजी संस्थेचे फारुक शेख अमीर यांच्या स्वाक्षरीने दिले आहे.