Home महत्वाची बातमी बोर्डी येथे घरावर पडले निंबाचे झाड,घरातिल सामानांचे नूकसान…. सुदैवाने कुठलीही जिवित हानी...

बोर्डी येथे घरावर पडले निंबाचे झाड,घरातिल सामानांचे नूकसान…. सुदैवाने कुठलीही जिवित हानी नाही…..

173

अकोट

देवानंद खिरकर बोर्डी := अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे मातंग पूर्यातील महादेवाचे मंदिरा जवळ असलेले कित्येक वर्षा पासुन असलेले जुने निंबाचे मोठे झाड हे काल रात्रि 2.00 वाजताच्या सुमारास अच्यानकपणे बोर्डी येथिल सखाराम आकाराम अंभोरे व अय्यूब शहा याशीन शहा यांच्या घरावर वसाडी नगापूर रस्त्यावर इलेक्ट्रीक पोलवर बूड़ातून ऊपटून पडले.यामधे सखाराम अंभोरे यांच्या राहत्या घरावर पडल्याने घरावरिल टीनपत्रे,व घरातील टिव्ही,व अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.व अय्यूब शहा याशीन शहा यांचे दुकानावरील टीनपत्रे व भींतीचे नुकसान झाले.मात्र या मधे दोघांच्याही घरातील कुठक्याही व्यक्तीचे जिवित हानी वगैरे झाली नाही.तरी या बाबतचा आज सकाळी दोन पंच्या समक्ष पंचनामा करुन अकोट तहसिलवर अहवाल सादर केला आहे.तरी दोघेही व्यक्ती गरिब असल्यामुळे शासनाने त्वरीत दखल घेवून नूकसान भरपाई मिळवून द्यावी.