Home जळगाव चोपडा येथे कोविड केअर कॅम्प बाबत डॉक्टरांची कार्यशाळा संपन्न

चोपडा येथे कोविड केअर कॅम्प बाबत डॉक्टरांची कार्यशाळा संपन्न

195

रावेर (शरीफ शेख)

जळगाव कोवीड केअर युनिट तर्फे चोपडा येथे सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिर घेण्याविषयी चोपडा येथील स्थानिक जनरल प्रॅक्टिशनर यांनी जळगाव कोविड केअर युनिटच्या पदाधिकारी यांना बोलवून गुरुवारी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते.
सदरच्या कार्यशाळेत जळगाव येथून केअर युनिटचे मुफ्ती अतिकुरराहेमान, डॉक्टर जावेद खान, फारुक शेख, तय्यब शेख व अनिस शाह यांनी चोपडा येथे जाऊन स्थानिक डॉक्टर व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसोबत कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

*चोपडा येथील डॉक्टरांचा समावेश*
डॉ अयुब ,डॉक्टर सादिक शेख, डॉक्टर फिरोज शेख ,डॉक्टर निषाद सय्यद ,डॉक्टरर शेख डॉक्टर अन्वर कुरेशी डॉक्टर नवाज शेख डॉक्टर रफिक शेख डॉक्टर सय्यद डॉक्टर फारुक शेख डॉक्टर वसीम शेख डॉक्टर एक बाल खान डॉक्टर सालार डॉक्टर अजहरुद्दीन यांची उपस्थिती होती.

*कार्यशाळेची सुरुवात*
मुफ्ती अतिकउर रहेमान यांच्या पवित्र कुराणाने कार्य शाळेची सुरवात झाली.
कार्यशाळेचे उद्देश प्रताप महाविद्यालयाचे नाजिम शेख यांनी विशद केले एकबाल सर यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर जावेद शेख जळगाव यांनी सर्वेक्षण व मेडिकल कॅम्प चे महत्व विशद केले
डॉक्टर निषाद सय्यद यांनी कोरोना, कोरोन टाईन याबाबत प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी व प्रशासन जनता यामधील भूमिकेबाबत आपली भूमिका मांडून अशावेळी काय करावे असा प्रश्न उपस्थित केला.

डॉक्टर फारुक शेख यांनी वैद्यकीय शिबिर कसे असावे व त्यात काय काय करावे याबाबत मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.

त्यावर कोविड केअर युनिटचे जळगाव येथील फारुक शेख यांनी सविस्तर अशी माहिती विशद केली त्यात मालेगाव शहराने अवलंबलेली पद्धत त्याच धर्तीवर जळगावात राबवले गेलेले सात वैद्यकीय शिबिर,शिबिर घेण्यामागील उद्देश, शिबिरा मध्ये रुग्णांना व लोकांना कौन्सिलिंग कशा पद्धतीने करावी, यावर आपले विचार प्रकट केले त्यासोबत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक शैक्षणिक व धार्मिक संघटना यामध्ये समन्वयाची भूमिका कशी निभवावी याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.
चोपडा येथे हे वैद्यकीय शिबिराचे आवाहन चोपडा शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर उपाय म्हणून त्वरित चोपळा येथील डॉक्टर व जळगाव येथील तज्ञ डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच एका शिबिराचे आयोजन करण्यात येईल असे जळगाव होईल केअर युनिट तर्फे फारुक शेख यांनी घोषित केले.
चोपडा येथील सर्व डॉक्टरांनी यास टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली.
मुफ्ती अतिकुररहेमान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पवित्र कुराण, प्रेषितांचे जीवन चारित्र्य व आजचे व्हिगन्यान यावर प्रकाश झोत टाकला.

कार्यक्रमाची सांगता मुफ्ती अतिकउर रहेमान यांच्या दुवा ने करण्यात आली.