Home बुलडाणा उद्याच्या बंदसाठी वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना सूचना

उद्याच्या बंदसाठी वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना सूचना

172

शहर बंद ठेवण्याचे केले आवाहन….!

अमीन शाह

शेगाव , दि. २३ :- केंद्र शासनाचे विविध आर्थिक धोरण याशिवाय नागरिकता संशोधन कायदा येणार की या विषयाला विरोध करण्यासाठी निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उद्या शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे हा बंद यशस्वी व्हावा यासाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात बहुजन वंचित आघाडी आणि शहरातील विविध मुस्लिम संघटनांच्या वतीने संयुक्तिक रॅली काढून व्यापाऱ्यांना उद्या बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिम (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) धोरणाच्या माध्यमातून सरकारने ‘आरएसएस’ प्रेरित विषमतावादी व्यवस्था आणण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करीत, झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी येत्या शुक्रवारी, २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी चे प्रणेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे,’ उद्याचा बंद यशस्वी व्हावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात बहुजन वंचित आघाडी आणि इतर मुस्लीम संघटनांच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये सायंकाळी आवाहन रॅली काढण्यात आली यावेळी उद्या स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद ठेवावे अशी विनंती बाजारातील किरकोळ व्यावसायिकांसह मुख्य बाजारपेठ मधील व्यापाऱ्यांना करण्यात आली बहुजन वंचित आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र शेगोकार यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली.