Home मराठवाडा नांदेड डाक विभागा तर्फे गोरगरीब भटकंती कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू ‘अन्नपूर्णा किट’ वाटप.

नांदेड डाक विभागा तर्फे गोरगरीब भटकंती कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू ‘अन्नपूर्णा किट’ वाटप.

112

नांदेड – ८ एप्रिल रोजी सध्या संपुर्ण देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.
संपुर्ण देश लॉकडाउन झाल्यामुळे दररोज मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.

बाहेर गावाहून मोलमजुरी करून पोट भरण्यासाठी ग्यानमाता शाळेच्या परिसरात अनेक बांधकाम मिस्त्री बाहेर राज्यातील कुटुंब बऱ्याच महिन्यांपासून राहातात. लॉकडाउन झाल्यापासून त्याच्या कुटूंबियावर उपास मारीची वेळ आली यांचा विचार करून डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांनी डाक विभागाच्या कल्याण निधी मधून डाक अधीक्षक नांदेड यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तु ‘अन्न पूर्णा किट ‘ ज्या मध्ये गहू, तांदूळ, गोडतेल , तूर डाळ, हात धुण्यासाठी साबण , मिठ ,लाल मिरची आज छोटुशी मदत या कुटूंबियांना देण्यात आली. आलेल्या महा संकटाना दूर करण्यासाठी शासकीय यंत्रणा मदतीचा हात पुढे करत असल्याने गोरगरीब जनते मध्ये आशयाची किरणे जिवंत झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसून आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.या मदतीला साहयक डाक अधीक्षक,पोस्ट मास्तर, डाक निरीक्षक व डाक टीम कर्मचारी उपस्थित होते.