Home विदर्भ अकोट ग्रामीण पोलिसांची लॉक डाऊन मध्ये अवैध देशी दारु वाहतुक करणार्यावर धडक...

अकोट ग्रामीण पोलिसांची लॉक डाऊन मध्ये अवैध देशी दारु वाहतुक करणार्यावर धडक कार्यवाही

64
0

देशी दारूसह टाटासुमो असा 4,67,280 रुपयेचा मुद्देमाल जप्त

देवानंद खिरकर

अकोला / आकोट – आज दिं.09/04/2020 रोजी पहाटे अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे डीबी स्काड पथकाला एक टाटासुमो गाडी अकोट वरुन ग्राम कालवाडी मार्गाने चौहट्या कडे देशी दारु घेवून जाणार आहे अशी गोपनीय माहीती मिळाल्या वरुन अकोट ग्रामीणचे ठाणेदार फड यांनी अकोट ते कालवाडी रोडवर नाकाबंदी लावली असता.मिळालेल्या माहीती प्रमाणे एक पांढर्या रंगाची टाटासुमो येतांना दिसली तिला थांबवुन पंचासमक्ष गाडीतील ईसमाला त्यांचे नाव ,गाव ,पत्ता विचारले असता त्यांची नावे मंगेश महादेव एकीरे वय 35 वर्ष गोपाल प्रल्हाद वावरे वय 33 वर्ष दोन्ही राहणार चौहट्टा बाजार असे आहे.सदर गाडीचे झडती घेतली असता त्या गाडीत सहा बॉक्स मध्ये (प्रति बॉक्स 48 नग)देशी दारू टँगो पंच कंपनीचे 288 नग बॉटल किंमत 17,280 रुपये व सदर दारू वाहतुक करिता वापरलेली पांढर्या रंगाची एक टाटासुमो गाडी किंमत 4,50,000रुपये असा एकुण 4,67,280 रुपयेचा मुद्देमाल मिळुन आला.तो पंचासमक्ष जप्त केला.व आरोपी विरुध्द कलम 65 अ,ई 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 188 भा.द.वी.प्रमाणे गुन्हा दाखल करुण तपासात घेत्ला आहे.सदर अवैध दारू पुरवीणार्या देशी दारु दुकानावर व व्यवसस्थापकावर वरीस्ठाचे आदेशाने कार्यवाही करण्यात येणार आहे.सदरची कारवाई मा.श्री.सुनिल सोनवणे उपविभागिय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार फड,गुन्हे शोध पथकाचे नारायण वाडेकर,अनिल सिरसाट,प्रवीण गवळी,गजानन भगत यांनी केली.