Home जळगाव अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर यांच्या हाकेला आटावाडे सरपंच गणेश महाजन, यांची साथ

अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर यांच्या हाकेला आटावाडे सरपंच गणेश महाजन, यांची साथ

42
0

रावेर (शरीफ शेख)

मौजे अटवाडे ता. रावेर जि जळगांव येथील गणेश महाजन सरपंच यांचे पुढाकाराने अटवाडे गावातील 60 गरजू व गरीब कुटुंबाना गहू,तांदूळ, तुरडाळ, तेल,गुळ, मीठ, मिरची पावडर, शेंगदाणे, चहा पावडर, साखर असलेले किट मा गणेश महाजन सरपंच, मा प्रकाश तायडे ग्रामसेवक ,मा शैलेश झोटे तलाठी ,मा नगीन कुयटे पोलीस पाटिल, मा उज्वल अग्रवाल प्रगतशील शेतकरी,मा चंद्रकांत पाटील उपसरपंच ,मा सुनिल महाजन ,ग्रा प सभासद मा योगेश पाटील सामाजिक कार्यकर्ते, मा प्रविण धनायते प्रगतशील शेतकरी, दामोदर कचरे प्रगतशील शेतकरी यांचे सहकार्याने मा डॉ अजित थोरबोले प्रांत अधिकारी फैजपूर, व मा उषाराणी देवगुणे तहसीलदार रावेर यांचे हस्ते किट वाटप करणेत आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
रावेर आणि यावल तालुक्या
मधील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की,या अडचणीच्या परिस्थितीमध्ये गोरगरिब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे..तरी विनंती की,जेवढे शक्य असेल तेवढे जीवनावश्यक वस्तू आपण आपल्या जवळच्या ग्रामपंचायत,नगरपालिका किंवा तहसीलदार कार्यलयात जमा करावे त्यांचा
मी आभारी राहिन असे
श्री .अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर, यांनी जाहीर आवाहन केले होते. याला प्रतिसाद साथ म्हणून आटवाडे लोकनियुक्त सरपंच गणेश महाजन यांनी गोरगरीबांना अन्न दान केले.व सर्व सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, यांनीही या संकट समयी संवेदनशीलता दाखवून थोड्या प्रमाणात हातभार लावावा अशी श्री गणेश महाजन यांनी
साद सर्वांना घातली.

Unlimited Reseller Hosting