Home मराठवाडा किनवट वनविभागाच्या वतीने जनतेला आव्हान.

किनवट वनविभागाच्या वतीने जनतेला आव्हान.

267

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. ०९ :- कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किनवट वनविभागाच्या वतीने किनवट वन परिक्षेत्रातील सर्व गावात जाऊन स्पीकर व भिंती पत्रक लावून वन वणवा, अवैध वृक्षतोड इत्यादी वन गुण्यांची जनजागृती करण्यात आली.
यामध्ये जंगलात न फिरण्याचे, पार्टी न करण्याचे, मॉर्निंग वॉक न करण्याचे,जंगलात आग न लावणे व घरीच राहण्याचे जीपवर लाऊड स्पीकर लावून जनतेला आव्हान केले.ही जनजागृती वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संतवाले, वनरक्षक संभाजी घोरबांड, साईदास पवार, अरुण चुकालवर, गजानन कापसे, कुलदीप मुळे, रवी दांडेगावकर, वाहनचालक दांडेगावकर यांनी केली आहे.