Home मुंबई मालाड परिसरातील खासगी क्लिनिक बंद , कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक डॉक्टर फरार

मालाड परिसरातील खासगी क्लिनिक बंद , कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक डॉक्टर फरार

640

प्रतिनिधी मुंबई – रवि गवळी

मुंबई उपनगर मधील असणारे सामान्य रुग्णसेवा बंद असल्याने खाजगी सेवा देणारे डॉक्टरानी या भीतीने दवाखाने बंद कोरोनाच्या दहशतीने परिसरातील खासगी दवाखाने बंद असल्याचे स्पष्ट चित्र आहे. मालाड परिसरातील खासगी क्लिनिक व काही हॉस्पिटल यांनी रूग्णसेवा देण्याऐवजी या संकटांला घाबरून पोबारा केला आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खासगी दवाखाने सुरू ठेवावेत, नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका असे आवाहन वारंवार करूनही रूग्णसेवा ही ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर मात्र कोरोनाची लागण होऊ नये या भीतीने दवाखाने बंद ठेवली आहे. मालाड विभागीय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात खासगी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यासंबंधीचे आदेश प्रशासन यांनी दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली आहे महाराष्ट्रात अनेक संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले गेले.राज्य शासनाने तातडीने पावले उचलत करोनाचा प्रसार वाढू नये म्हणुन शाळा,महाविद्यालये, थिएटर, मॉल्स, खाजगी क्लासेस, आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले. पूर्ण लॉकडाऊन घोषित केले. मालाड परिसरातील खासगी क्लिनिक डॉक्टर गिरीधन गडा बचनी नगर दफ्तरी रोड , डॉ वोरा शांती क्लिनिक शिवाजी चौक , फोफनी क्लिनिक हिरामार्केट , डॉ अशोक शाह हिरा मार्केट डॉ शरद ओझा गणेश भुवन खाऊ गल्ली विवेक क्लिनिक खांडवाला लेन , डॉ प्रकाश कुलकर्णी खांडवाला लेन मेहता क्लिनिक दत्तमंदिर रोड संजीवनी क्लिनिक दत्तमंदिर रोड काही हॉस्पिटल यांनी रूग्णसेवा देण्याऐवजी या संकटांला घाबरून क्लिनिक बंद ठेवली आहे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खाजगी दवाखाने सुरू ठेवावेत, नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका असे आवाहन करूनही रूग्णसेवा ही ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर मात्र कोरोनाची लागण होऊ नये या भितीने दवाखाने बंद ठेवत आहे .

मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार यासारखे गंभीर आजार असलेले व थंडी, ताप,सर्दी, खोकला आजार असलेल्या रूग्णांची अवस्था रामभरोसे आहे. साधा फ्ल्यू म्हणजेच कोरोना असु शकतो या शक्यतेने लोकांबरोबर डॉक्टरसी गर्भगळीत झाले आहे. मालाड परिसरात किराणा, दुध, मेडिकल, पिठाची गिरणी, भाजी विक्रेते,कोणतीही पर्वा न करता सेवा पुरवित आहे. डिंडोशी पोलीस, पी उत्तर महानगर पालिका अहोरात्र कर्तव्य बजावत असताना खासगी दवाखाने बंद असल्याने शस्त्रक्रिया तर दूर उपचार मिळणेही दुरापास्त झाले आहे.
कोरोना संसर्गजन्य असल्याने संपकार्तून प्रसार होण्याची भीती आहे, परंतु डॉक्टरांनी सर्व प्रकारची दक्षता घेऊन नागरिकांना सुविधा दिल्या पाहिजेत अन्यथा कोरोनाच्या संकटामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊन दुर्दैवाने त्यातून काही रूग्णांना मृत्यूलाच सामोरे जाण्याची दाट शक्यता आहे. खासगी दवाखाने सेवा पुरविण्यात असमर्थ ठरत असतील तर त्याबाबत तातडीने कार्यवाही करून किंवा खाजगी दवाखाने अधिग्रहीत करून शासनाच्या माध्यमातून चालवावे व लोकांना दिलासा द्यावा अन्यथा खाजगी क्लिनिक चालवणारे डॉक्टर्स यांची डिग्री रद्द करावी अशी मागणी जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थाचे अध्यक्ष रवि गवळी यांनी केली आहे.