Home महाराष्ट्र सम्पूर्ण देशात आहे कोरोनाचा मारा मात्र रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा गरिबांना सहारा

सम्पूर्ण देशात आहे कोरोनाचा मारा मात्र रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा गरिबांना सहारा

65
0

नंदूरबार प्रतिनिधी जिवन महाजन

सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान असल्याने 144 लागू करण्यात आले म्हणून लोकांना बाहेर पडले मुश्किलीचे झाले आहे..
अनेक परिवारांना भरपूर संकटांना सामोरे जावे लागत आहे

अनेक परिवार अशी आहेत की दिवसाला कमवतील आणि 2 वेळेचे जेवण आपल्या परिवराला देतील मात्र सध्या परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेक परिवारांनवर उपासमारीची वेळ आली आहे

मात्र नंदूरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांनी नंदूरबार मधील 1 ही गरीब कुटुंब उपाशी झोपणार नाही हा विळा उचलत रोज सकाळी आणि सायंकाळी 150 किलो तांदळाची किचडी ताक व लहान मुलांन साठी बिस्कीट अशे अनेक वस्तीत जाऊन गरीब हातमजुरी करणाऱ्या कुटुंबांना वाटप करण्यात येते

त्यातच जे पोलीस रात्रंदिवस आपल्या सेवेशी रस्त्यावर कोरोनाशी लढण्यासाठी उभे आहेत त्यांना देखील ताक चे वाटप करण्यात येथे आणि जो पर्येंत लॉक डाऊन संपत नाही तो पर्येंत वाटप देखील करण्यात येणार आहे अशे रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांनी सांगितले