Home मराठवाडा नांदेड पोलीस अधीक्षकांच्या सतर्कतेमुळे धार्मिक उत्सवातून होणारा अनर्थ टळला.

नांदेड पोलीस अधीक्षकांच्या सतर्कतेमुळे धार्मिक उत्सवातून होणारा अनर्थ टळला.

101

नांदेड, दि.८ ( राजेश भांगे ) – पूर्ण देशभरात कोरोनाचा हाहाकार माजला असून संचारबंदी लागू आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व उत्सव व धार्मिक कार्यक्रम आपल्या घरात साजरे करावे असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी घोषित जमावबंदी व संचार बंदी असतानाही तरोडा बुद्रुक नवीन वसाहात येथे २० ते ३० जण एकत्र येऊन धार्मिक उत्सव साजरा करण्याच्या तयारीत होते. याबाबतची माहिती नांदेड पोलीस अधीक्षक मा.मगर यांना मिळतातच त्यांनी विमानतळ पोलीस स्टेशनला कारवाई करण्याचे आदेश दिले .विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी जाऊन सर्वांना ताब्यात घेतले व १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.नांदेड जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी अहोरात्र महीनत घेत आहेत ,पोलिस व आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे अद्यापही नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या निजामबाद व बिदर या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून कोरोना नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरच येऊन ठेपला असतानाही पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे अंतर जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवल्यामुळेच नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही.