Home महत्वाची बातमी अकोल्यात आढळला ‘पहिला पॉझिटिव्ह’ रुग्ण

अकोल्यात आढळला ‘पहिला पॉझिटिव्ह’ रुग्ण

98

१२३ पैकी ८६ जणांचे अहवाल प्राप्त, ८५ निगेटिव्ह; ३७ प्रलंबित

पवन जाधव ,

अकोला,दि.७- जिल्ह्यात आज (सायं. पाच वा.) अखेर प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील पहिला कोरोना संसर्गित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण अकोला शहरातील बैदपूरा भागातील रहिवासी आहे. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) केवळ एक जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाला. त्याचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत १२३ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी ८६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ८५ निगेटिव्ह आहेत. तर एका जणाचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. हा रुग्ण ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात विलगीकरण करुन दाखल करण्यात आला आहे. अद्यापही ३७ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हे ३७ जण सध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून २५८ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ७४ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. (५७ जण गृह अलगीकरणात तर १७ जण संस्थागत अलगीकरणात) तर १२६ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ५७ जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.