
प्रतिनिधी पवन जाधवबार्शीटाकळी , जी , अकोलाकोरोना महामारी सुरू झाल्या पासून शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी अडचण जात असल्याने पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक संघपाल वाहूरवाघ यांनी बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी
मा. दिपक तायडे सर बार्शीटाकळी यांना निवेदन दिल्यावर लगेच भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांना शहरात भाजीपाला विक्रीसाठी परवाना तयार करून शेतकऱ्यांना दिल्येत. यामुळे गावातील भाजीपाला उत्पादन शेतकरी घरोघरी जाऊन विकू शकतील. यावेळी
मा. मोहन वाघ साहेब (जिल्हा कृषी अधीक्षक), अकोला, मा. अजय कुलकर्णी साहेब(उपविभागीय अधिकारी कृषी) अकोला, यांनी शेतकऱ्यांना परवाने दिलेत. यावेळी उपस्थित
मा. दिपक तायडे सर (तालुका कृषी अधिकारी),मा. महादेव राऊत सर (मंडळ कृषी अधिकारी), मा. साकेत लांडे (कृषी परिवेक्षक), मा. विजय हांडे (कृषी सहाय्यक) संघपाल वाहूरवाघ (तालुका समन्वयक) पानी फाऊंडेशन बार्शीटाकळी उपस्थित होते.