Home विदर्भ अकोल्यातील तीन किलो मीटर परिघातील भाग सिल

अकोल्यातील तीन किलो मीटर परिघातील भाग सिल

13
0

पवन जाधव ,

अकोला

जिल्ह्यातला पहिला कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण हा अकोला शहरातला आढळला आहे. हा रुग्ण ज्या भागातील आहे त्या बैदपूरा या भागाला केंद्रबिंदू मानून तीन किमी परिघातील परिसर तसेच दोन किमीचा बफर झोन असा पाच किमी परिसर ‘सिल’ करुन त्यातील तीन किमी परिसरात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येईल. हा संपूर्ण भाग बंद ठेवण्यात येईल. बाहेरुन कुणालाही या भागात प्रवेश दिला जाणार नाही वा या भागातून कुणीही बाहेर जाऊ शकणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. यासंदर्भात स्वतंत्र आदेश जिल्हाप्रशासनाने निर्गमित केले. या भागाला सिलबंद राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ही तैनात असेल, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखून या भागातील लोक बाहेर व बाहेरील लोक या भागात येणार नाहीत यासंदर्भात कलम १४४ नुसार संचारबंदीची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलिसांना दिले आहेत.