मराठवाडा

लातुर शहर व ग्रामीण भागातुन , ३६.४४ लाखांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त

Advertisements

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

लातुर – एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना अवैध धंद्यांना उधाण आले आहे. तलब भागवण्यासाठी छुप्यारीत्या गुटखा विकणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सदर कारवाया लातूर शहर व ग्रामीण पोलिसांनी केल्या असुन. या कारवाई दरम्यान तब्बल ३६ लाख ४४ हजार १५० रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला.
गुटख्याचा साठा करून विक्री केल्या प्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोरोना रोखण्यासाठी राज्यात २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी गेल्या ८-१० दिवसांपासून तलबी लोकांच्या तोंडची चव गेली आहे. गुटखा, सिगारेट, पान मसाला, तंबाखू खाणाऱ्यांच्या तलबी भागवण्यासाठी लातूर शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याचे समजताच कासारगाव शिवारात पोस्टे लातूर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पत्र्याच्या शेडमध्ये साठवलेला २६ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
दुसरी कारवाई पोलिस स्टेशन शिवाजीनगर शहर पोलिसांनी शामनगर परिसरातील एका घरातून २ लाख ३१ हजारांचा गुटखा, सुगंधी तंबाखू व अन्य पदार्थ जप्ते केले.
तिसरी कारवाई एमआयडी पोलिसांनी परिसरातील केली. गोदामात साठा केलेला ७ लाख ५१ हजार ७५१ रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले तर चोथ्या कारवाईत वि.चौख पोलिसांनी राहत्या घरातून २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात प्रेमनाथ मोरे, रफीओद्दिन सय्यद (४८), धनंजय कोंबडे व अजर शेख (२३) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्यांची उकल लातूरचे पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलीस अधीक्षक हिंमत पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी संचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि व्ही. एस. नवले, हवालदार रामचंद्रे ढगे, पोलीस नाीक महेश पारडे, माधव बिलापट्टे, अरुप शिंगडे, अभ्युमनू सोनटक्के, पोलीस शिपाई सोमनाथ खडके, पथक २ मधील पोउनि घाडगे, हवालदार बालाजी मस्के, पोलीस नाईक धैर्यशिल मुळे, महिला पोलीस नाईक कौशल्या घुगे, पोलीस शिपाई अमोल हत्ते, पथक ३ मधील पोउन पाठारे, नेहरकर, हवालदार वहिद शेख, पोलीस नाईक सारंग लाव्हरे, पोलीस शिपा चंदू पाडे, पथक ४ मधील सपोनि दयानंद पाटील, हवालदार देविदास मुराेळे, हवासदार प्रवीण गायकवाड, पोलीस शिपाई अंबादास पारगावे आदी पोलीस पथकांनी केली.

नांदेड जिल्ह्यात सुद्धा तालूक्याच्या ठिकाणी याच लाॕकडावुनचा फायदा घेवुन गुटका, देशी व विदेशी दारू सर्रास चढ्या भावाने विक्री होत असल्याचे समजते तरी देखील स्थानिक पोलिस प्रशासना कडुन कारवाई ची अपेक्षा असुन देखील का होत नाहि असे जनसामान्यातुन चर्चा होताना दिसुन आले.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...