Home मुंबई कासमबाग इंदिरानगर गलीच्छवस्ती मध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण रहिवाशी मध्ये भीतीचे वातवरण

कासमबाग इंदिरानगर गलीच्छवस्ती मध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण रहिवाशी मध्ये भीतीचे वातवरण

39
0

मुंबई – रवि गवळी

कोरोना बाधीताची संख्या हि सध्या वाढतच आहे इंदिरा नगर मधली रहिवाशी याला एस के पाटील रुग्णालयात अशक्त असल्या कारणाने भरती करण्यात आले होते चार दिवस उलटून सुधा त्यात कुठलाही फरक जाणवले नसल्याने त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवण्यात आले रुग्णांची आरोग्याची विविध प्रकारे चाचणी घेण्यात आली होती त्याची प्रकृती ठीक झाली असता त्याला घरी पाठवण्यात आले रुग्णाची घेतलेल्या चाचणी मध्ये पॉझिटिव्ह आढळून आले त्याला तात्काळ भगवती रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे तरी या झोपडपट्टीत अत्यंत दाटीवाटीच्या परीसर आहे सर्वात जास्त दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

कासमबाग भागात कोरोना बाधित रुग्ण
आढळल्यानंतर महापालिकेने कडक उपाययोजना अध्यापि सुरु केली नाही .
तसेच रुग्णाच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटर परिघात नागरिकांना निर्बध घालण्यात आले नाही . मनपा पी उत्तर चे सहायकआयुक्त संजोग कबरे यांनी हे निर्बंध घातलेले नाही पोलीसवाला प्रतिनिधी यांनी फोन केल्यावर त्यांचा कडून कुठलेही उत्तर आले नाही .आगामी 14 दिवस हे निर्बंध
घालण्यात यावे त्यानुसार 3 किलोमीटर परिघात कोणीही बाहेरील व्यक्ती या क्षेत्रात जाऊ देऊ नये .इतकेच नाही तर या भागातील नागरिक बाहेर पडू शकणार नाही, याची दक्ष्यता मनपा पोलिसांनी घ्यावी
इंदिरानगर मधील रुग्णचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेने सर्व भागात आरोग्य तपासणी करण्यात यावी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . काय आहे कोविड-१९ हा एक प्रकारचा कोरोना विषाणू आहे. तो पूर्णतः नवीन असल्याकारणाने त्याच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. हा विषाणू इतर कोरोनापेक्षा वेगळा असल्याकारणाने जेव्हा तो आपल्या शरीरात पहिल्यांदा शिरतो तेव्हा त्याच्या विरुद्ध आपले शरीर कोणतीही प्रतिचढाई आखू शकत नाही. फ्लू हाही एक प्रकारचा विषाणू आहे. त्याने जेव्हा पहिल्यांदा आपल्या शरीरात शिरकाव केला होता तेव्हा कोरोनासारखीच स्थिती उत्पन्न झाली होती. पण एकदा लस बाजारात आल्यानंतर व शरीराने फ्लू विरोधात प्रतिकारशक्ती विकसित केल्यानंतर काही प्रमाणात मृत्युदर कमी झालेला आहे.विषाणू-निर्मित आजार बरा करणं जीवाणू-निर्मित आजार बरा करण्यापेक्षा अवघड असतं. कारण विषाणूंवर अँटिबायोटिकचा फारसा प्रभाव पडत नसतो. आज कोरोनाग्रस्त रुग्णांना त्यांच्या द्वितीय लक्षणांवर उपचार देण्यात येत आहेत. अशाप्रकारे त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीला उर्जित करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. एखादी लस तो रोग होणारच नाही याची दक्षता घेतो.जगातील अनेक प्रयोगशाळेतून कोविड-१९वर संशोधन सुरू आहे. ज्या लोकांना हा आजार झाला त्यांचे सॅम्पल सूक्ष्मपणे अभ्यासल्यानंतर वैज्ञानिकांच्या असे लक्षात आले आहे की मानवाची रोगप्रतिकार प्रणाली फ्लूवर जशी कार्य करते तशीच कोविड-१९वर सुद्धा करते. संक्रमण झालेल्या काही हजार लोकांच्या दूषित पेशी तपासल्यानंतर कोविड-१९चे रोगी किती दिवसात बरे होतील, याचा अचूक अंदाज बांधणं त्यांना शक्य झाला आहे. ते प्रगतीपथावर आहेत व लस निर्मिती प्रवासात अग्रेसर आहेत. ऑस्ट्रेलियातील काही संशोधक कोविड-१९ रुग्णांवर एड्स व मलेरिया विरोधी औषधांचा वापर करण्याच्या तयारीत आहेत. रुग्णांवर त्याचा किती सकारात्मक फरक पडतो हे तपासल्यानंतर लस निर्मितीची योजना बनवण्यात येईल. इतरही अनेक औषधांची चाचणी घेण्यात येत आहे. इबोलाची जी औषध प्रणाली विकसित करण्यात आली होती त्याचीही चाचणी कोविड-१९ विरुद्ध घेण्यात येत आहे. ही लस येत्या काही महिन्यात बाजारात येण्याची शक्यता . . चीन मध्ये आधीच आल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही

Unlimited Reseller Hosting