Home मराठवाडा पोस्टमन बापु दोष कुणाला द्यावा….आम्ही जन्मा पासूनच लॉक डाउन मध्ये हाय….!

पोस्टमन बापु दोष कुणाला द्यावा….आम्ही जन्मा पासूनच लॉक डाउन मध्ये हाय….!

86
0

नांदेड / बोधडी , ( सुरेश सिंगेवार विपणन आधिकारी नांदेड ) आदिवासी भागातील किनवट तालुक्यातील बोधडी येथील चित्र:
जगभरात थैमान माजविलल्या कोरोना हरविण्यासाठी नांदेड डाक टीम सर्व समांतर अंतर ठेवून व तोंडावर मास्क लावून आणि सोबत हँड वॉश ठेऊन नियमांचे पालन करीत देश सेवा करीत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध दैनिकात व टिव्ही बातम्या मधून पहावयास मिळत आहे.

एक चित्र मनाला चटका लावणारे आदिवासी भागातील किनवट तालुक्यातील बोधडी येथे निराधार लाभार्थी पुंडलिक तुकाराम कांबळे व त्यांची पत्नी भागाबाई पुंडलिक कांबळे हे दोघे ही दोन्ही डोळ्यांने आंधळे आहेत.

हे दोघे ही निराधार लाभार्थी असल्याने बोधडी येथील नांदेड डाक टीम चे पोस्टमन सुमेध सभा काळबांडे हे यांना लॉक डाउन असल्याने त्यांना निराधाराचे अनुदान देण्यासाठी गेले असता चालण्याचा आवाजा वरून एका तोडक्या मोडक्या झोपडीतून आवाज येतो पोस्टमन बापू दोष कुणाला ध्यावा…. आम्हीं जन्मा पासूनच लॉक डाउन मध्ये हाय आमची पगार आली काय.असा आवाज भागाबाई कांबळेयांच्या अतकरणातू बाहेर पडला पोस्टमन म्हणतो हो आजी…पोस्टमन यांनी दोघांचे अंगठे व आधार मोबाईल स्कॅन करून घेऊन प्रत्येकी तीन तीन हजार रुपये निराधार अनुदान काल या गरीब अंध कुटूंब परिवाराना वाटप करण्यात आले.डाक टीम ग्रामीण भागात व शहरी भागातील नागरिकांसाठी दहा हजार रुपया पर्येंत कोणत्याही बँकेतील खात्या मधील पैसे काढण्याची व पैशे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.पण त्या खात्याला आधार जोडणे आवश्यक आहे. आशा बँक खातेदारांना व पोस्ट ऑफिस व इंडिया पोस्ट पेमेंट बँक खातेदारांना डाक टीम प्रत्येकाच्या दारी जाऊन पैशाचे वाटप करण्यात येत आहे.
डाक कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणू पादुर्भाव मध्ये देश सेवा करीत आहेत. भारत सरकारने डाक कर्मचाऱ्यांना पण आरोग्य कर्मचाऱ्यां प्रमाणे पन्नस लाखाचा विमा संरक्षण देण्यात यावे अशी नागरिकांत चर्चा केली जात आहे.
डाक विभाग हे लॉक डाउन मध्ये दररोज ग्रामीण भागात व शहरी भागातील गरीब,अपंग, दिव्याग,निराधार,आदिवासी भागात व दुर्मिळ भागत पोस्टमन मार्फत AEPS द्वारे पैशाचे मोठ्या प्रमाणात वाटप केले जात आहे. नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे अहवान नांदेडचे डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांनी केले आहे. नांदेड डाक टीम कौतुक संपूर्ण नांदेड जिल्ह्यात होत असल्याची चर्चा नागरिका मधुन होत आहे.

Unlimited Reseller Hosting