Home महत्वाची बातमी “सावधान” कोरोनाच्या नावाखाली ऑनलाईन गंडवणाऱ्यांचा सुळसुळाट – पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना, फ्री...

“सावधान” कोरोनाच्या नावाखाली ऑनलाईन गंडवणाऱ्यांचा सुळसुळाट – पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना, फ्री नेटफ्लिक्स, फ्री रिचार्ज, इएमआय ३ महिने वाढवण्याच्या लिंकपासून सावध राहा

160

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगेकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊनचे आदेश दिला आहे. या लॉकडाऊन काळात कर्जाचे हप्ते ३ महिने न घेण्याचा सल्ला आरबीआयकडून बँकांना, फायनान्स कंपन्यांना देण्यात आला. हीच संधी साधून ऑनलाईन गंडवणारे चोरटे लुटमारीसाठी सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना, फ्री नेटफ्लिक्स, फ्री रिचार्ज, इएमआय ३ महिने वाढवण्याच्या लिंक पाठवून तसेच फोन करून नागरिकांना ऑनलाईन लुटण्यासाठी जाळे पसरवत आहेत. मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगा, अशा प्रकारे चोरट्यांची लुटमार सुरू आहे.
या भामट्यांच्या जाळ्यात अडकू नये, शासनातर्फे अथवा बँकांकडून कुठल्या प्रकारची लिंक पाठवलेली नाही, मोबाईलवर आलेल्या लिंक ओपन करू नका, कोणालाही ओटीपी सांगून नका, असे आवाहन नवी मुंबई पोलीस दलाच्या सायबर गुन्हे शाखेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.