मराठवाडा

अता रस्त्यावर विना काम फिरणाऱ्या वर होणार कडक कार्यवाही , पो , निरीक्षक , एम , बी , खेडकर

Advertisements

सय्यद नजाकत ,

बदनापूर ,

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन केलेले असतांना नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पळत असल्याने प्रशासन विनंती करून करून थकले आहे त्यातच जालना शहरात एक कोरोना लागण झालेला रुग्ण मिळाल्याने प्रशासनाने सक्त भूमिका घेण्याचा निर्णय घेऊन आज पासून शहरातील जीवणाआवश्यक वस्तूची आणि भाजी पाल्याची दुकाने सकाळी ३तास व सायंकाळी २ तास उघडी ठेवली जाणार आहे या वेळेव्यतिरिक्त कोणीही रस्त्यावर किंवा बाहेर आढळून आल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांनी दिला आहे

कोरोना रोगाच्या धर्तीवर शासनाने लॉक डाऊन केल्याने जिल्हादंडाधिकारी रविंद बिनवडे यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केलेला असतांना बदनापूर तालुक्यात या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे ,शहरातील काही मंडळी विनाकारण दुचाकी वाहने घेऊन रस्त्यावर हिंडत आहे तर काही मंडळी कोणतीही खरेदी करायची नसतांना रस्त्यावर व घराबाहेर हिंडत आहे व पोलिसांनी हटकल्यास आम्हाला जीवनावश्यक वस्तू खरेदी ला जायचं असे उत्तर देऊन गैरफायदा घेत आहे

दरम्यान ६ मार्च रोजी जालना शहरात एक महिला रुग्ण कोरोना लागण झालेली असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाने दक्षता म्हणून कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून उद्या ७ मार्च पासून बदनापूर शहरातील किराणा दुकान,भाजी पाला व इतर जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ७ ते १० व सायंकाळी ५ ते ७ यावेळेतच उघडी ठेण्यास परवानगी देण्यात आली आहे या बाबत सर्वांना सूचना देण्यात आले असून या वेळेव्यतिरिक्त कोणी दुकाने उघडल्यास किंवा रस्त्यावर फिरतांना दिसून आल्यास थेट पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांनी दिली
******
*किराणा सामान व भाजीपाला घरपोच देखील मिळू शकतो*- *गणेश ठुबे*
बदनापूर शहरातील काही किराणा दुकानदार,भाजीपाला विक्रेते तसेच औषधी दुकानदार कोरोना रोगाच्या धर्तीवर घरपोच सेवा देण्यासाठी तत्पर असून दुकाने सकाळी तीन तास व सायंकाळी दोन तास उघडी ठेवली जाणार आहे तर भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने मार्केट कमिटी परिसरात आखून दिलेल्या जागेत लावावी नसता त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल असे नगर पंचायत च्या वतीने गणेश ठुबे यांनी सांगितले

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...
मराठवाडा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील ...