Home मराठवाडा राजनी गावातील दीड हजार जणांना क्‍वारांटइन करण्याच्या प्रशासनाच्या सूचना ,

राजनी गावातील दीड हजार जणांना क्‍वारांटइन करण्याच्या प्रशासनाच्या सूचना ,

171

जालना, /सय्यद नजाकत

शहरातील दुःखी नगरातील कोरोना पॉझिटिव्ह निघालेली महिला दोन दिवस घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. रांजणी येथे संपर्कात आलेल्या सुमारे दीड हजार जणांना क्‍वारांटइन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षिका असलेल्या मुलीकडे पॉझिटिव्ह महिला होती. विशेष म्हणजे शिक्षिका मुलीने अनेक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप केल्याने खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांचे पथक रांजणी येथे तळ ठोकून आहे.
पॉझिटिव्ह महिला मुलीकडे दोन व तीन एप्रिल रोजी रांजणी येथे आली होती. सदर महिला व मुलगी शाळेतील पाच शिक्षकांसह शेकडो विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येते. शिक्षिका मुलीच्या वाहनाच्या चालकाचाही शोध घेण्यात येत आहे. एकूणच रांजणी गावांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. घनसावंगीचे तहसीलदार खैरनार, उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल, गटविकास अधिकारी तसेच पोलिसांचे पथक गावात तळ ठोकून आहे. एवढ्या मोठ्या लोकांना कुठे क्‍वारांटइन करण्यात येईल याबाबत ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आली. प्रत्येकाने आपल्या घरात अलगीकरण करावे अन्यथा संबंधितांना घनसावंगी अथवा अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल असे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना वाटप केला पोषण आहार
पॉझिटिव्ह असलेल्या महिलेच्या मुलीने जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप केले. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सदर शिक्षिका शाळेतील पाच शिक्षिकांसह चालकांच्या संपर्क आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोठ्या परिसराची पाहणी
सुमारे दीड हजार नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून ठेवावे लागणार आहे. गाव परिसरात अशी मोठी जागा उपलब्ध होईल का याची चाचपणी वरिष्ठ अधिकारी करीत आहेत.