Home मराठवाडा शाहगड येथील 26 रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह . जालना येथील एक महिला पाझेटिव्ह...

शाहगड येथील 26 रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह . जालना येथील एक महिला पाझेटिव्ह आढल्याने उडाली खळबळ ,

64
0

बीड/अँड शेख ताज अहेमद अन्सारी

जालना जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला नव्हता, त्यामुळे जालनेकरांत समाधान होते. परंतु आता कोरोनाचा पहिल्यांदाच महिला रुग्ण आढळून आल्याने जालनेकरांच्या मनात धडकी भरली आहे. सदरील महिलेची प्रवास हीस्ट्री ही सौदी अरेबीयातुन आल्याची असल्याचे सांगण्यात येत आहे.तर काल पाठविण्यात आलेल्या शहागड सह 31 रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. काल शाहगड येथून 26 जणांना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे

जालना शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाकडून जिल्हा प्रशासनाला नुकताच अहवाल देण्यात आला असल्याचेही सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता, जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून 213 जनांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तर काल 32 जनांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते,यामध्ये शाहगड येथील 26 जणांचा समावेश होता त्यापैकी 1 जनाचा रिपोर्ट हा पॉझीटीव्ह आला आहे तर शाहगड सह इतर सर्व रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत. सदरील रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत 213 जनांपैकी 176 जनांचे रिपोर्ट आले असून ते निगेटीव्ह आहेत. तर उर्वरीत काही जनांचे रिपोर्ट आज सायंकाळपर्यंत येणे अपेक्षीत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शाहगड हे गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याला लागून असल्याने आणि शाहगड येथे कोरोना संशयित सापडल्याने जालना व बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते मात्र शाहगड येथील काल 5 मार्च रोजी पाठविण्यात आलेले 26 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शाहगड सह बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे

Unlimited Reseller Hosting