Home महत्वाची बातमी मा , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूळे तो झाला बेघर , ???

मा , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूळे तो झाला बेघर , ???

89
0

पेटत्या दिव्याने आग लागली सर्व काही होताच नवहता झाला ,???

अमीन शाह

चंद्रपूर ,

जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथिल श्रीहरी वाघमारे यांच घर दिव्याच्या आगीत जळुन खाक..*

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदि यांच्या आदेशाचे पालन करत श्रीहरी वाघमारे यांनी 5 एप्रिल ला संध्याकाळी 9 वा. घरी दिवे लावले अन त्याच दिव्याने वाघमारे कुटूंबियांच्या डोक्यावरील छत जाळुन खाक केल. कोरोणा विषाणू जगभरात थैमान घालत आहे त्या साठी भारतात देखिल आपत्ती पुर्व व्यवस्थापन म्हणून देशभरात 21 दिवसाचा लाँकडाउन करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री यांनी या कोरोणाचा महामारीत दिनरात्र आपली जबाबदारी पार पाडत असलेल्या पोलिस कर्मचारी , डॉक्टर , परिचारीका, सफाई कामगार , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , मदतनिस, तसेच भाजीपाला वाले , ड्रायव्हर यांच मनोधैर्य वाढविण्यासाठी , त्यांच्या सोबत संपुर्ण देश आहे हे दाखविण्यासाठी हे घरचे बल्ब बंद करुन दिवे, मोमबत्ती, टार्च लावण्याची विनंती केली होती. करोडो भारतीयांनी आपल्या घरी दीवे लावले .
त्या पैकीच श्रीहरी वाघमारे यांनी सुध्दा आपल्या घरी दिवे लावले होते. त्या दिव्याने पेटघेत संपुर्ण घर जळुन खाक झाले . सुदैवाने कसलीच जिवीत हानी झालेली नाहि.

Unlimited Reseller Hosting