Home रायगड पंतप्रधानाच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिणार्याला तरुणाला कर्जत पोलिसांनी केली अटक

पंतप्रधानाच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिणार्याला तरुणाला कर्जत पोलिसांनी केली अटक

221
0

कर्जत – जयेश जाधव

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिहिलेले मजकूर व फोटो एका इसमाने स्व:ताच्या मोबाईलवर व्हाॅटसअप स्टेटसला ठेवला त्यामुळे दोन सामाजिक गटात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवेल अशा प्रकारचे स्टेटस ठेवून सामाजिक गटामध्ये शत्रुत्व वाढेल अशा प्रकारे प्रसार करणार्या एका इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
कर्जत पोलिस ठाणे हद्दीत काल दिनांक ५मार्च रोजी १०:१५ वाजण्याच्या सुमारास कशेळे येथील राहणा-या अब्दुल फारुक सिध्दीकी या इसमाने त्याच्या मोबाईल व्हाॅटसअप स्टेटसवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नडडा याचे चेहऱ्याचा फोटो कुत्र्याच्या तोंडाच्या ठिकाणी इडीट करून त्याच्या गळ्यात लोखंडी साखळ्या बांधून त्या साखळ्याची दुसरी बाजू सायकलवर बसलेल्या असदउभ्रीन ओवेसी याच्या हातात असून त्याच्या बाजूला “इन कुत्तों को पाकिस्तान में छोडकर आता हू”असा मजकूर लिहिलेला फोटो त्याने स्व:ताच्या व्हाॅटसअप स्टेटस ठेवला होता.त्यामुळे दोन सामाजिक गटात तेढ निर्माण होऊन शत्रुत्व वाढेल अशा प्रकारे प्रसार करणार्या अब्दुल फारुक सिध्दीकी (वय२९)रा.कशेळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कर्जत पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ८०/२०२०भा.द.वि.क.५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार प्रवीण लोखंडे करीत आहे.