विदर्भ

महागांव येथील खुनाचा गुन्हा अवघ्या ४८ तासात उघड

Advertisements
Advertisements

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची उत्कृष्ट कार्यवाही….!

रवि माळवी

यवतमाळ , दि. ०५ :- महागांव येथील मनोज विश्वनाथ वाठोरे (२५) यास कुणीतरी अज्ञात आरोपीने चाकु, गुप्ती सारख्या धारधार शस्त्राने पोटावर, छातीवर वार करुन जिवानीशी ठार केले होते. ही घटना दिनांक १ एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान महागांव येथील पुस नदी ते हिंदु स्मशानभुमीचे दरम्यान असलेल्या पांदन रस्त्यावर घडली होती. सदर प्रकरणी मृतकाची आई उषा विश्वनाथ वाठोरे यांचे फिर्यादी वरुन महागांव पोलीस स्टेशनला अप.क्र.१८३/२० भादंवि कलम ३०२ प्रमाणे अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सुरेश शिवदास चौगुले रा.महागांव व संजय उर्फ गाब्या रंगराव गायकवाड असे आरोपींची नावे आहेत. पोलीस अधिक्षक एम. राज कुमार व अपर पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांनी गुन्ह्याचा आढावा घेवून सद्यास्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखेकडील दोन पथके व नियंत्रन कक्ष येथील स्थानिक जनसंपर्क असलेले दोन अधिकारी यांचे पथक तसेच पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथक दिनांक २ एप्रिल २०२० पासुन महागांव परिसरात मुक्कामी ठेवून तपासाची गती वाढवीली होती. मागील ३ दिवसांपासून सदरचे पथकांनी मृतकाबाबत प्रत्येक बारीकसारीक माहीती गोळा करुन महागांव भागातील अभिलेखावरील गुन्हेगार तसेच मृतकासोबत वैर असलेले नातेवाईक तसेच त्याचे मित्र यांचेवर तपास केंद्रीत केला होता. मृतक हा सर्वसामान्य कुटूंबातील असल्याने तसेच त्याचे मित्रमंडळी व नातेवाईकांसोबत अतिशय चांगले संबंध असल्याने पोलीस पथकांस तपासाची दिशा निश्चित होत नव्हती परंतु दिनांक ४ एप्रिल रोजी तपास पथकाने महागांव भागातील मागील दोन वर्षापासुन मृतकाचे संपर्कात असलेले ईसमांबाबत तपासाची दिशा निश्चित केली असता गोपणीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, मृतकाचे शरीरावरील जखमा सदृष्य हत्यार महागांव येथील सुरेश शिवादास चौगुले याचेकडे पाहिले असल्याची माहिती मिळाल्यावरुन नामे सुरेश चौगुले यास चौकशीकामी ताब्यात घेवून त्याचेकडे कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता त्याने अनैतिक संबंधाचे संशयावरुन मृतक मनोज विश्वनाथ वाठोरे याचा दिनांक १ एप्रिल २०२० रोजी रात्रीचे दरम्यान त्याचा मित्र संजय उर्फ गाब्या रंगराव गायकवाड याचे मदतीने त्यास पुस नदीचे काठी घेवून जावून त्यांचे जवळ असलेल्या धारधार शस्त्राने वार करुन खुन केला असल्याचे सांगीतले. प्रकरणी दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून पुढील तपासकामी महागांव पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक, यवतमाळ एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नूरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, पोलीस हवालदार गोपाल वास्टर, मुन्ना आडे, गजानन डोंगरे, पंकज पातुरकर, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, मो.ताज, पंकज बेले, नागेश वास्टर, दत्ता दुमारे तसेच पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथकातील पोलीस हवालदार सै.साजीद, अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगवार यांनी पार पाडली तर गुन्ह्याचा पुढील तपास महागांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दामोदर राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंगेपल्लु, पोलीस उपनिरीक्षक उमेश भोसले, महिला पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करीत आहेत.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...