Home विदर्भ चार दिवसानंतर मनोजच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश.

चार दिवसानंतर मनोजच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश.

194

अनैतिक संबंधाच्या संशयातुन हत्या केल्याची आरोपींची कबुली…!

हरीश कामारकर – महागाव

यवतमाळ , दि. ०५ :- महागाव येथील प्रभाग १० मधील रहिवासी मनोज वाठोरे याचा १ एप्रिल (बुधवार) रोजी रात्री महागाव येथील पूसनदी ते हिंदू स्मशानभुमी जवळ नदीकाठावर संशयास्पद मृतदेह आढळला होता तर त्याच्या शरीरावर तब्बल १० घाव आढळून आले होते. अत्यंत निर्दयीपणे त्याच्या पोटावर व छातीवर कुणीतरी अज्ञात आरोपीने चाकु किंवा गुप्ती सारख्या धारदार शस्त्राने ठार केले होते.त्यानंतर मृतकाच्या आई उषा विश्वनाथ वाठोरे यांच्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन महागाव येथे अप.क्र.183/20कलम 302 भांदवि प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक,श्री.एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नुरूल हसन यांच्या आदेशानव्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी गुन्ह्याचा आढावा घेऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके व नियंत्रण कक्ष येथील स्थानिक जनसंपर्क अधिकारी यांचे पथक तसेच पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक दिनांक २ एप्रिल पासून महागाव परिसरात मुक्काम ठोकुन तपासाची गती वाढवली होती. मागील ३ दिवसापासून सदरचे पथकाने मृतकाबाबत प्रत्येक बारीकसारीक माहिती गोळा करून महागाव पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार तसेच मृतकासोबत वैर असलेले नातेवाईक, त्याचे मित्र यांचेवर तपास केंद्रित केला होता. मृतक हा सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्याचे मित्रमंडळी व नातेवाईकासोबत अतिशय चांगले संबंध असल्याने पोलीस पथकास तपासाची दिशा निश्चित होत नव्हती.परंतु दिनांक ४ एप्रिल (शनिवार)रोजी तपास पथकाने महागाव भागातील मागील दोन वर्षांपासून मृतकाच्या संपर्कात असलेले इसमाबाबत तपासाची दिशा निश्चित केली असता गोपनीय माहिती मिळाली की, मृतकाच्या शरीरावरील जखमा करणारे सदृष्य हत्यार महागाव येथील सुरेश शिवदास चौघुले याच्याकडे पाहिले असल्याची माहिती मिळाल्यानुसार त्या आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून मृतक मनोजचा दिनांक १ एप्रिल २०२० रोजी रात्रीला त्याचा मित्र संजय उर्फ गब्या रंगराव गायकवाड याच्या मदतीने त्यास पूसनदीच्या काठी घेऊन जावून त्यांच्या जवळ असलेल्या धारधार शस्त्राने वार करून खून केला असल्याचे कबूल केले त्यावरून दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन महागाव यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी म पोलीस अधीक्षक यवतमाळ एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक नुरूल हसन, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप चव्हाण,पोउपनिरीक्षक निलेश शेळके, पोउपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार,पोउपनिरीक्षक अमोल राठोड,पोहवा गोपाल वास्टर,मुन्ना आडे,गजानन डोंगरे,पंकज पातूरकर,उल्हास कुरकुटे,किशोर झेंडेकर, मो. ताज,पंकज बेले,नागेश वास्टर, दत्ता दुमरे तसेच पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील सै. साजीद, अजय डोळे,पोना रुपेश पाली,योगेश डगवार यांनी पार पडली तर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन येथील ठणेदार दामोदर राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू,उपनिरीक्षक उमेश भोसले,महिला पोउपनिरीक्षक मोरे हे करीत आहेत.