Home महत्वाची बातमी कोरोना विषाणू लढाईत 3.5 लाख माजी सैनिक तयार – नारायण अंकुशे

कोरोना विषाणू लढाईत 3.5 लाख माजी सैनिक तयार – नारायण अंकुशे

63
0

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – कोरोना विषाणू च्या लढाईत राज्यातील 3.5 लाख माजी सैनिक ( आर्मी, नेव्ही, एअर फोर्स ) मधील निवृत्त जवान तयार असल्याचे माजी सैनिक आघाडी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संयोजक नारायण अंकुशे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

यावेळी अंकुशे म्हणाले की, भारताची सेवा करण्यासाठी आम्ही सैन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करून भरती झालो. आता आम्ही सेवा निवृत्त होऊन आलो असलो तरी ही आम्ही आता जवान आहोत. सैन्यात भरती होऊन आम्ही अनेक लढाई लढलो. ही विषाणू च्या लढाईत आम्ही देश सेवा करण्यासाठी सरकारने आम्हाला केव्हाही बोलवावं आम्ही तयार आहोत. काही ठिकाणी आमचे माजी सैनिक कोरोना च्या लढाईत काम करत आहेत. जिल्हा सैनिक नोंदणी नुसार 2.5 लाखाची तर 1 लाख सैनिक नोंदणी नसलेले असे एकूण 3.5 लाख माजी सैनिक दि. 01 जानेवारी 2020 पर्यंत निवृत्त झालेले माजी सैनिक असल्याचे मत अंकुशे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पत्र लिहून या कोरोना च्या लढाईत आम्ही माजी सैनिक तुमच्या सोबत आहोत असे म्हटले असून पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सेवा देण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. सर्व सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून परिवाराचा विचार न करता, देशाचे रक्षण केले आहे. आता तीच परिस्थिती आली आहे. जिवाणू च्या लढाईत प्रशासनाला आपण सर्वांनी मिळून मदत करून या कोरोना विषाणू ला संपवायचे आहे. नाही तर हे संपूर्ण देशावरचे संकट आहे. आमचा एकच उद्देश आहे भारत मातृभूमीचे काहीही करून संरक्षण करायचे आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे माजी सैनिक आघाडी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संयोजक नारायण अंकुशे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलं आहे. यावेळी माजी सैनिक कॅप्टन रावसाहेब साळुंखे, सुभेदार रेवन पाटील, उद्धव पाटील आदी उपस्थित होते.
Unlimited Reseller Hosting