Home विदर्भ आरोपिंनि मध्यप्रदेशातून विकत घेतले होते देशी कट्टे.????

आरोपिंनि मध्यप्रदेशातून विकत घेतले होते देशी कट्टे.????

73
0

अकोट येथिल आयटीआय च्या मागे करत होते फ़ायरिंगचा सराव.

अकोट ,

देवानंद खिरकर := प्रहार जनशक्ती

पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपिंची संख्या पाचवर पोहचली.आरोपिंना दोन्ही देशी कट्टे मध्य प्रदेशातून पुरवण्यात आले.अचुक नेम साधण्यासाठी तिघांनी आयटीआच्या मागे एका शेतात फ़ायरिंगचा सराव कल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.पाचही आरोपिंना शनिवारी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने तिघांच्या पोलिस कोठडीत 9 एप्रिल परंत वाढ केली आहे. तर शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या दोघांना 13 एप्रिल परंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुन्हा याच प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेले आरोपी निखिल सेदाणी,गुंजन चिंचोळे अशी त्यांची नावे आहेत.सरकार पक्षातर्फे ऐडवोकेट जयकृष्ण गावंडे यांनी आरोपींनि कोणा कडून देशी कट्टा विकत घेतला,कुठे कुठे सराव केला या बाबत अधिक तपास करायचा आहे.,असा.युक्तिवाद केला.
एका आरोपीने कपडे जाळले,तर दुसरा आरोपीने कपडे नदीत लपवले.आरोपी अल्पेश दुधेने घटनेच्या दिवशी त्याच्या अंगावर जे कपडे होते ते जाळले.तर त्याच्या कडून चार काडतुस जप्त कल्याची माहीती आहे.तसेच दूसरा आरोपी शाम नाठे याने त्याचे कपडे खाई नदीत लपवून ठेवले होते.ते कपडे व विहिरीत फेकलेला देशी कट्टा पोलिसांनी त्याच्या कडून जप्त केला.सुत्रधार पवन सेदानी याच्या गाडीच्या डीक्कीत खाली मैगझीन दिसून आले होते.असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला.
आरोपी निखिलने इंदुर व प्रिंप्रीया येथून पाठवले कट्टे
आरोप निखिल सेदानी हा पवन सेदानीचा चुलत भाऊ आहे.तो इंदुरला राहतो.त्यानेच इंदुर जवळील प्रिंप्रीया व आणखी एका ठीकाणाहून देशी कट्टे विकत घेतले व ते आरोपी गुंजनला सोपविले.त्यानंतर गुंजनने आरोपी अल्पेश व शाम या दोघांना आयटीआयच्या पाठीमागे एका शेतात अचुक नेम कसा साधायचा व देशी कट्टा कसा चालवायचा या विषयी धडे दिल्याचेही पोलिस तपासा समोर आले.आरोपींनि कुठे कुठे सराव केला,त्यांना कुणी आणखी सोबती होते का,या विषयीचा तपास पोलिस करणार आहेत,या तपासासाठीच पोलिसांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली.
आरोपी वाढण्याची शक्यता.
तुषार पुंडकर यांच्या ह्त्यकांडातील आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे.पिस्तूल कोणी विकले,आरोपींना पैसे कुणी पुरवीले,ईतर काही आरोपीचा या प्रकरणाशी सबंध आहे का,असे अनेक प्रश्नांची उकळ पोलिसांंना करायची आहे.पोलिस.अधिक्षक अमोल गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शैलेश सपकाळ यांची टिम तसेच अकोट शहरचे ठाणेदार संतोष महल्ले तपास करत आहेत.