Home विदर्भ हिवरखेडवर आजपासून ड्रोन कॅमेऱ्याची नजर ,

हिवरखेडवर आजपासून ड्रोन कॅमेऱ्याची नजर ,

97

देवानद खिरकर

हिवरखेड ,

संपूर्ण जगात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता देशात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही नागरिकांना मुक्त संचारास बंदी आहे. तसेच जमावबंदी सुद्धा लागू आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून चौदा एप्रिल पर्यंत लॉकडाउन असल्यामुळे लोकांनी घरातच थांबणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार संपूर्ण यंत्रणेचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. तरीपण आपल्या आणि इतरांच्या जीवाची काळजी नसणारे अनेक महाभाग कोणतेही कारण नसताना गावात रस्त्यावर आणि चौकाचौकात जाणून-बुजून फिरणे, गल्ली बोळांमध्ये गोळके करून चर्चासत्र करणे, असे प्रकार पोलिसांच्या सर्रास निदर्शनात येत आहेत. अनेक जणांचे टोळके करून सामाजिक आरोग्यास बाधा पोहोचविणारे कृत्य करणे असे प्रकार होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. हे सर्व लक्षात घेता हिवरखेड ग्रामपंचायत तसेच कर्तव्यदक्ष सरपंच अरुणाताई सुरेश ओंकारे, ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल, ठाणेदार आशिष लवंगळे, हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, पी एस आय विठठल वाणी, विनोद गोलाईत, सामाजिक कार्यकर्ते पंकज इंगळे, तसेच गस्तीवरील पोलीस कर्मचारी इत्यादींच्या संकल्पनेतून आज 5 एप्रिल पासून हिवरखेड शहरात ड्रोन कॅमेऱ्याचा अभिनव उपक्रम सुरू होणार आहे.
शासनाचे आदेश न मानणाऱ्या, गर्दी करणाऱ्यांवर आणि हुल्लडबाजांवर, ड्रोन कॅमेरा द्वारे पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. ह्याकरिता हिवरखेड ग्रामपंचायत पुढाकार घेणार आहे.