Home जळगाव पाथरी येथील पोलिस पाटील यांची हातभट्टीवर कारवाई

पाथरी येथील पोलिस पाटील यांची हातभट्टीवर कारवाई

196

दारू निर्मितीचे रसायन केले नष्ट..!!

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील पाथरी तालुका येथे तरुणांना म्हसावद रस्त्यालगत असलेल्या एका शेतात गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता हातभट्टी दारु गाळण्यासाठी असलेले रसायन मिळून आले. ही बाब त्यांनी पोलीस पाटील संजीव लंगरे यांना सांगितली असता, ते त्या ठिकाणी जावून गावठी दारु गाळण्यासाठी असलेले सुमारे 200 लीटर रसायन जागेवर नष्ट केले. गावातील तरुणांच्या जागरुकतेमुळे व पोलीस पाटील लंगरे याच्या तत्परतेने गावठी दारुची हातभट्टी उद्ध्वस्त झाली आहे. पोलीसांच्या व्यस्ततेचा गैरफायदा घेतला जात होता. कोरोना ग्रामस्तरीय जनजागृती समितीने गावात लोकांची गर्दी होवू नये, म्हणून काळजी घेतली आहे.
पो. पाटील संजीव लंगरे यांचे कौतुक MICD पो. स्टे. चे पो. निरीक्षक रनजित सिरसाळ पो उप निरीक्षक सोनवणे सर यांनी त्यांचे कौतुक केले व स्वतः पोलीस पाटील यांनी कारवाई केल्याने त्यांचे परीसरात कौतुक होत आहे.